---Advertisement---

यशस्वी जयस्वालच्या आयुष्यात खुलतेय प्रेमाची कळी? ‘या’ विदेशी तरुणीसोबत जोडलं जातंय नाव

On: मंगळवार, सप्टेंबर 3, 2024 10:09 PM
Yashaswi Jaiswal
---Advertisement---

क्रीडाजगतात क्रिकेटपटूंच्या मैदानावरील प्रदर्शनाबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही भरपूर चर्चा रंगतात. भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिल, इशान किशन, यष्टीरक्षक रिषभ पंत त्यांच्या लव्ह अफेयर्समुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा स्टार सलामीवीर यशस्वी जयस्वाल त्याच्या प्रेमप्रकरणामुळेच चर्चेत आला आहे.

जयस्वालने अगदी लहान वयातच क्रिकेट संघात स्वत:चे चांगले स्थान निर्माण केले आहे. ऑक्टोबर 2019 मध्ये, यशस्वी जयस्वालने इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत द्विशतक झळकावले होते आणि असे करणारा तो जगातील सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरला होता. क्रिकेटसोबतच जयस्वालच्या वैयक्तिक आयुष्याचीही बरीच चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर त्याच्या अफेअरच्या चर्चा रंगत आहेत. जयस्वालचे नाव मॅडी हॅमिल्टनसोबत जोडले जात आहे.

भारतीय क्रिकेटर जयस्वालने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये तो मॅडीसोबत पोज देताना दिसला होता. जयस्वालने पोस्टच्या कॅप्शनमध्ये ‘फॅमिली’ असे लिहिले होते. त्यानंतर यशस्वी आणि मॅडीच्या अफेअरच्या बातम्या रंगू लागल्या आहेत. नेटिझन्स मॅडी हॅमिल्टन कोण आहे? हे शोधण्यात व्यस्त आहेत. तिचे काही फोटो सोशल मीडियावर ट्रेंड झाले आहेत. फेब्रुवारी 2023 मध्ये व्हॅलेंटाईन डे आठवड्यात देखील हेच फोटो ट्रेंड केले गेले.

मॅडी आणि यशस्वी अनेकदा एकत्र स्पॉट झाले होते
मॅडी यूकेची आहे. मॅडी अनेकदा जयस्वालसोबत सुट्टी आणि कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये दिसली आहे. तिचे सोशल मीडियावरील फोटो पाहता, असे दिसते की मॅडी देखील जयस्वालच्या कुटुंबात पूर्णपणे एकरूप झाली आहे. मॅडी अनेकदा मॅच दरम्यान यशस्वीला चिअर करायला जाते. हैदराबादमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीदरम्यान मॅडी भारतीय जर्सीमध्ये यशस्वी जयस्वालला चिअर करताना दिसली होती. त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या बातम्या सोशल मीडियावर अधिक गाजल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या-

पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर बांगलादेशच्या कर्णधाराची भारताला चेतावणी, वाचा काय म्हणाला?

हरभजन सिंगच्या सल्ल्यामुळे कोहली आहे दिग्गज खेळाडू? माजी खेळाडूने केला खुलासा
मोहम्मद शमी किती श्रीमंत आहे? वाढदिवसादिनी जाणून घ्या एकूण संपत्ती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---