बांगलादेश क्रिकेट संघाने पाकिस्तानला त्यांच्याच घरात हरवून इतिहास रचला आहे. रावळपिंडीत खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी पाहुण्या संघाला विजयासाठी 143 धावा करायच्या होत्या. बांगलादेशने दुसरा सामना 6 गडी राखून जिंकला. क्रिकेटच्या इतिहासात बांगलादेशने पाकिस्तानला कसोटी मालिकेत पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या विजयानंतर बांगलादेश संघाचा कर्णधार नजमुल हसन शांतो याने भारतीय संघाला देखील चेतावणी दिली आहे.
पाकिस्तानला त्यांच्याच घरच्या मैदानावर क्लीन स्वीप दिल्यानंतर बांगलादेशचा कर्णधार शांतो कमालीचा आत्मविश्वाशी दिसला. त्याने आपल्या संघाचे कौतुक करण्यासोबतच आगामी मालिकेआधी भारतीय संघाला हवं राहण्याचा इशारा दिला. दोन्ही संघांदरम्यान 19 सप्टेंबर पासून दोन सामन्यांची कसोटी मालिका होईल. पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवल्यानंतर बोलताना शांतो म्हणाला,
“आमची पुढची मालिका भारतीय संघाविरुद्ध आहे. ती मालिका आमच्यासाठी महत्त्वपूर्ण असेल. या मालिकेतील विजयाने आमचा आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे. ज्याप्रकारे मेहदी याने या परिस्थितीत गोलंदाजी केली आणि पाच बळी मिळवले हे कौतुकास्पद होते. मला अपेक्षा आहे की, भारताविरुद्ध तो अशाच प्रकारची कामगिरी करेल.”
बांगलादेश क्रिकेट संघाने पाकिस्तानला त्यांच्याच घरात हरवून इतिहास रचला आहे. रावळपिंडीत खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी पाहुण्या संघाला विजयासाठी 143 धावा करायच्या होत्या. त्यांनी केवळ चार गडी गमावत हे आव्हान पार केले. उभय संघांमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात देखील बांगलादेशने पाकिस्तानला पराभूत केले होते. कसोटी इतिहासात बांगलादेशने पाकिस्तानला पराभूत करण्याची ही पहिली वेळ होती.
भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यानच्या दोन सामन्यांच्या मालिकेला 19 सप्टेंबर रोजी सुरुवात होईल. या मालिकेसाठी दोन्ही संघांची अद्याप घोषणा झालेली नाही. भारतीय संघाला या दोन्ही सामन्यात विजय मिळवणे महत्त्वाचे असेल. कारण, या विजयासह भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतिम सामन्यात प्रवेश करण्याची शक्यता वाढेल.
महत्त्वाच्या बातम्या-
हरभजन सिंगच्या सल्ल्यामुळे कोहली आहे दिग्गज खेळाडू? माजी खेळाडूने केला खुलासा
मोहम्मद शमी किती श्रीमंत आहे? वाढदिवसादिनी जाणून घ्या एकूण संपत्ती
“आता बदला घेण्याची…” बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीपूर्वी ऑस्ट्रेलिया कर्णधाराचे खळबळजनक वक्तव्य