बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यान झालेल्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला तब्बल ६० धावांनी हरवत मालिका ४-१ ने जिंकली. तसेच ऑस्ट्रेलिया संघाला आजपर्यंतचा सर्वात लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. या विजयासह बांगलादेशने प्रथमच ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका जिंकण्याचा विक्रम केला आहे.
पाचव्या टी२० सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या २० षटकांत ८ विकेटच्या बदल्यात १२२ धावा केल्या. त्यानंतर या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला ऑस्ट्रेलियन संघ केवळ ६२ च्या धावसंख्येवर सर्वबाद झाला.
त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाची ही आजपर्यंतची आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील सर्वात नीचांकी धावसंख्या ठरली. याच्या आधी लॉर्ड्सवर २००५ साली इंग्लंड विरुद्धच्या सामन्यातील ७९ धावा या सर्वात निचांकी धावसंख्या होती.
त्याचबरोबर या सामन्यात केवळ ९ धावा देऊन ४ विकेट्स घेतलेला, अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन सामनावीर आणि मालिकावीर अशा दोन्ही पुरस्कारांचा तो मानकरी ठरला.
मागील सामन्यात शाकिबच्या गोलंदाजीवर ऑस्ट्रेलियाच्या डॅनियल ख्रिश्चनने एका षटकात ५ षटकार लगावले होते. त्यामुळे बांगलादेशला तो सामना गमवावा लागला होता. मात्र या सामन्यात पुनरागमन करत शाकिबने ४ विकेट घेतल्या व यासह एक विक्रमही आपल्या नावे केला.
शाकिबने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या टी-२० सामन्यात ४ विकेट घेऊन, टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण १०० विकेट्सचा आकडा पार केला आहे. असा करणारा तो बांगलादेशचा पहिला तर जगातला लसिथ मलिंगा नंतरचा दुसराच गोलंदाज बनला आहे.
गोलंदाजीसाठी पूरक असलेल्या मैदानात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करत केवळ १२२ धावा केल्या. ज्यात सर्वाधिक धावा बांगलादेशचा सलामीवीर मोहम्मद नईमने २३ धावा केल्या. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाकडून खेळताना कर्णधार मॅथ्यू वेडने सर्वाधिक २२ धावा केल्या. वेड सोडून बाकी कोणत्याही ऑसी खेळाडूला २० धावांचा टप्पाही पार करता आल्या नाही.
महत्वाच्या बातम्या –
–ऑलिम्पिक स्पर्धेत ‘या’ द्रोणाचार्यांनी केलेल्या मेहनतीला आले अखेर यश; जाणून घ्या संपूर्ण माहिती
–“जो रुट नाही, तर बुमराहलाच पहिल्या कसोटीचा सामनावीर पुरस्कार मिळायला हवा होता”
–पहिला कसोटी अनिर्णीत सुटला, पण विराट आणि रहाणेच्या चिंतेत झाली वाढ; ‘हे’ आहे प्रमुख कारण