यूपी वॉरियर्स संघाने आरसीबीला 12 धावांनी पराभूत केले. यूपी वॉरियर्स आधीच अंतिम सामन्याच्या फेरी मधून बाहेर पडला आहे. पण आता त्यांनी आरसीबीला पराभूत करून त्यांनाही स्पर्धेच्या बाहेर केले. प्लेऑफच्या रेसमध्ये टिकून राहण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला हा विजय मिळवणे खूप महत्त्वाचे होते. शेवटच्या षटकात रिचा घोषची 69 धावांची तुफानी खेळी आरसीबीला पराभव होण्यापासून नाही वाचवू शकली नाही. तसेच यूपी साठी जॉर्जिया वॉलने 99 धावांची जबरदस्त अशी विजयी पारी खेळली.
या सामन्यात युपीने पहिल्यांदा फलंदाजी करताना 225 धावा केल्या होत्या. जो की महिला प्रीमियर लीगच्या इतिहासातील सगळ्यात मोठी धावसंख्या आहे. युपीने दिल्ली कॅपिटल्सचं हे रेकॉर्ड मोडलं आहे. ज्या संघाने 2023 मध्ये आरसीबीच्या विरुद्ध 223 धावा केल्या होत्या. तसेच बंगळुरू संघाकडे स्पर्धेमध्ये टिकून राहण्याचं तसेच 226 धावांची धावसंख्या रेकॉर्ड मोडण्याची संधी होती.त्यामुळे त्यांची प्लेऑफ मधील टिकून राहण्याची आशा जिवंत राहिली असती, पण यूपी वॉरियर्सने त्यांच्या आशा धुळीस मिळवल्या.
यूपीच्या विरुद्ध सामन्यापूर्वी आरसीबीने 6 सामन्यात फक्त 2 विजय मिळवले होते. त्यांचे 4 अंक होते आणि प्लेऑफच्या रेस मध्ये टिकून राहण्यासाठी त्यांना युपीचा पराभव करणे गरजेचे होते. पण विजय तर मिळालाच नाही, तसेच 12 धावांनी आरसीबीचा पराभव झाला. शेवटच्या 2 षटकात स्नेह राणाने 6 चेंडूत 26 धावांची पारी खेळून संघाला आशा दिल्या होत्या. पण शेवटच्या वेळात बंगळुरूची पूर्ण टीम संपूर्ण 20 षटक सुद्धा खेळू शकली नाही. त्यांनी सुरुवातीचे दोन सामने जिंकले होते, पण नंतर कोणी विचारही केला नसेल की हा संघ पुढचे पाच सामने हारून प्लेऑफ मधून बाहेर होईल.
हेही वाचा
चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना रोहितसाठी शेवटचा वनडे? जाणून घ्या कारण
आयसीसी स्पर्धेत ‘मालिकावीर’ पुरस्कार जिंकणारे भारतीय खेळाडू; पाहा यादी
चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये सर्वाधिक धावा करणारे 3 भारतीय फलंदाज





