---Advertisement---

अक्षर पटेलनंतर दिल्ली कॅपिटल्सचा ‘हा’ खेळाडू कोरोनाच्या विळख्यात

Anrich-Nortje
---Advertisement---

भारतात गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचा विळखा पडला आहे. कोरोनाच्या सावटाखाली ९ एप्रिल ते ३० मे या कालावधीत भारतात इंडियन प्रीमियर लीग २०२१ चे आयोजन करण्यात आले आहे. परंतु आयपीएलवरही कोरोनाचे काळे सावट पसरले आहे. मागील काही दिवसात आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंपैकी बऱ्याच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात आता दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज एन्रिच नॉर्किए याची भर पडली आहे. अक्षर पटेलनंतर दिल्लीचा कोणता खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळण्याची ही दुसरी वेळ आहे.

परंतु दिल्ली कॅपिटल्सने यांसंबंधी अद्याप अधिकृतपणे घोषणा केलेली नाही. माध्यमांतील वृत्तांनुसार मुंबईतील हॉटेलमध्ये क्वारंटाईन असताना नॉर्किएला कोरोनाची बाधा झाली असल्याची सांगितले जात आहे.

https://twitter.com/cricbuzz/status/1382265854750990339?s=20

शनिवारी (१० एप्रिल) रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध झालेल्या दुसऱ्या आयपीएल सामन्यात नॉर्किएला संघाबाहेर ठेवण्यात आले होते. मागील मोसमात दिल्ली संघाला अंतिम फेरीत नेण्यात दक्षिण आफ्रिकेच्या या वेगवान गोलंदाजांने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

दिल्ली संघाने एका निवेदनात म्हटले होते की, “दिल्ली कॅपिटल संघाचे वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आणि एन्रिच नॉर्किए मंगळवारी मुंबईतील हॉटेलमध्ये पोहोचले असून एक आठवडाभर ते क्वारंटाईन राहणार आहेत.”

यानुसार आतापर्यंत रबाडा आणि नॉर्किए आपला क्वारंटाईन कालावधी पूर्ण करुन सरावास सुरुवात करु शकले असते. परंतु क्वारंटाईन कालावधीदरम्यान झालेल्या कोरोना चाचणीत नॉर्किए पॉझिटिव्ह आढळल्याने त्याला सराव करण्याची मुभा देण्यात आलेली नाही. यामुळे पहिल्या सामन्याबरोबर तो दिल्लीच्या येत्या दुसऱ्या सामन्यालाही मुकण्याची शक्यता आहे. १५ एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध मुंबई येथे दिल्लीची दुसरी लढत होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘या’ खेळाडूची निवड करुन मुंबई इंडियन्सने मोठी चुक केली, माजी दिग्गजाचे धक्कादायक वक्तव्य 

सर्वत्र ‘सूर्या’च्या ९९ मीटरच्या षटकाराची चर्चा, पण हा शॉट कुठे आणि कधी खेळायला सुरुवात केली? पाहा

‘आज जे काही आहे, ते फक्त मुंबई इंडियन्समुळेच,’ केकेआरच्या क्रिकेटपटूचे मन जिंकणारे वक्तव्य

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---