---Advertisement---

टीम इंडियाला अलविदा केल्यानंतर आता पॅट्रिक फऱ्हार्ट करणार या आयपीएल संघाबरोबर काम

On: रविवार, ऑगस्ट 4, 2019 8:00 AM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचे माजी फिजिओ पॅट्रिक फऱ्हार्ट यांनी आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स संघाबरोबर पुढील 3 वर्षासाठी करार केला आहे. फऱ्हार्ट यांनी 2019 विश्वचषकानंतर भारतीय क्रिकेट संघाला अलविदा केला होता.

त्यांचा 2019 विश्वचषकानंतर भारतीय संघाबरोबरचा कार्यकाळ संपला आहे. ते भारतीय संघाबरोबर 2015 पासून होते. तसेच त्यांनी याआधी आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाब आणि मुंबई इंडियन्स संघाबरोबर काम केले आहे.

आता ते दिल्ली कॅपिटल्स बरोबर जोडले गेले आहेत. त्याबद्दल दिल्ली कॅपिटल्सने प्रसिद्धी पत्रक जाहिर केले आहे.

फऱ्हार्ट यांनी दिल्ली संघाशी केलेल्या कराराबद्दल म्हटले की ‘मला पुन्हा एकदा आयपीएलमध्ये काम करण्याची संधी मिळणार असल्याने मी आनंदी आहे. दिल्ली कॅपिटल्स हा असा संघ आहे ज्यांनी मागील काही वर्षापासून काही सकारात्मक बदल केले आहेत आणि त्याचा निकाल 2019 च्या आयपीएल मोसमात पहायला मिळाला. ते गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर होते.’

तसेच दिल्ली कॅपिटल्सचे सीइओ धिरज मल्होत्रा म्हणाले, ‘पॅट्रिक हे आमच्या संघाबरोबर असणे सन्मानाची गोष्ट आहे. पॅट्रिक सर्वोत्तम फिजिओ आहेत, यात शंका नाही. क्रिकेटपटूंमध्ये त्यांच्यासाठी मोठा आदर आहे. मला खात्री आहे आमच्या खेळाडूंना त्यांच्या उपस्थितीचा फायदा होईल.’

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

विराट कोहली-रोहित शर्मामधील ही शर्यत जिंकणार कोण?

या कारणामुळे भारत-विंडीज संघातील पहिला टी२० सामना होऊ शकतो रद्द…

आज २४ धावा करताच किंग कोहलीच्या नावावर होणार तो मोठा विक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment