आजपासून(3 ऑगस्ट) वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात 3 सामन्यांची टी20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज फ्लोरीडा येथे होणार आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीला खास विक्रम करण्याची संधी आहे.
या सामन्यात जर विराटने 24 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय क्रिकेटपटू ठरेल. तसेच सुरेश रैनाला मागे टाकेल आणि ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या एकूण खेळाडूंमध्ये सहाव्या क्रमांकावर येईल.
विराटचे सध्या ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये 266 सामन्यात 40.62 च्या सरासरीने 8369 धावा आहेत. यात त्याच्या 5 शतकांचा आणि 60 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच तो ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत रैना पाठोपाठ सातव्या क्रमांकावर आहे.
रैनाने ट्वेंटी20मध्ये 319 सामन्यात 32.65 च्या सरासरीने 8392 धावा केल्या आहेत. तो सध्या ट्वेंटी20 क्रिकेट प्रकारात सर्वाधिक धावा करणारा भारतीय क्रिकेटपटू असून ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या एकूण फलंदाजांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे.
ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विंडीजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने ट्वेंटी20 मध्ये 12808 धावा केल्या आहेत.
त्याचबरोबर या यादीत 8200 धावांसह भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा हा रैना आणि विराटच्या पाठोपाठ आठव्या क्रमांकावर आहे.
ट्वेंटी20 मध्ये (सर्व प्रकारच्या 20 षटकांच्या सामन्यात )सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –
12808 धावा – ख्रिस गेल (384 सामने)
9922 धावा – ब्रेंडन मॅक्यूलम (370 सामने)
9316 धावा – किरॉन पोलार्ड (475 सामने)
8803 धावा – डेव्हिड वॉर्नर (271 सामने)
8701 धावा – शोएब मलिक (345 सामने)
8392 धावा – सुरेश रैना (319 सामने)
8369 धावा – विराट कोहली (266 सामने)
8200 धावा – रोहित शर्मा (314 सामने)
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–‘हिटमॅन’ रोहित शर्माला ‘युनिवर्स बॉस’ गेलला मागे टाकत विश्वविक्रम करण्याची सुवर्णसंधी
–सौरव गांगुली म्हणतो, एक दिवस टीम इंडियाचा कोच नक्की बनेल पण…
–आज भारत-विंडीजमध्ये होणाऱ्या पहिल्या टी२० सामन्याबद्दल सर्वकाही…





