---Advertisement---

विराट कोहली-रोहित शर्मामधील ही शर्यत जिंकणार कोण?

On: शनिवार, ऑगस्ट 3, 2019 6:37 PM
---Advertisement---

आजपासून(1 ऑगस्ट) वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात 3 सामन्यांची टी20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज फ्लोरिडाला पार पडणार आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्माला खास विक्रम करण्याची संधी आहे.

सध्या आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिकवेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम रोहित आणि विराट या दोघांच्या नावावर विभागून आहे. या दोघांनीही 20 वेळा आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

त्यामुळे आज या दोघांनाही आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वप्रथम 21 व्यांदा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याची संधी आहे.

विराटच्या आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सध्या 67 सामन्यात 2263 धावा आहेत. यामध्ये त्याच्या 20 अर्धशतकांचा समावेश आहे.

तसेच रोहित आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असून त्याच्या सध्या टी20मध्ये 94 सामन्यात 2331 धावा आहेत. यात त्याच्या 4 शतकांचा आणि 16 अर्धशतकांचा समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक वेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारे खेळाडू-

20- रोहित शर्मा, सामने- 94

20- विराट कोहली, सामने- 67

16- मार्टिन गप्टील, सामने- 76

15- ख्रिस गेल, सामने- 58

15- ब्रेंडन मॅक्क्यूलम, सामने- 71

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

या कारणामुळे भारत-विंडीज संघातील पहिला टी२० सामना होऊ शकतो रद्द…

आज २४ धावा करताच किंग कोहलीच्या नावावर होणार तो मोठा विक्रम

‘हिटमॅन’ रोहित शर्माला ‘युनिवर्स बॉस’ गेलला मागे टाकत विश्वविक्रम करण्याची सुवर्णसंधी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment