२०२० आयपीएल गाजवल्यानंतर २०२१ च्या आयपीएलच्या हंगामासाठी दिल्ली कॅपिटल दिल्ली संघाने आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. दिल्लीच्या संघाने पूर्व भारतीय फलंदाज प्रवीण आमरे यांना आपले असिस्टंट कोच म्हणून नियुक्त केले आहे. तसेच प्रवीण आमरे यांनी याआधी दिल्ली कॅपिटल संघाचा प्रमुख खेळाडू अजिंक्य रहाणे यांच्या प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली आहे.
प्रवीण आमरे हे या आधी सुद्धा दिल्ली कॅपिटल्स संघासोबत होते.२०१४ पासून ते २०१९ पर्यंत त्यांनी दिल्ली कॅपिटल संघासाठी टॅलेंट हेड स्काऊट ची भूमिका पार पाडली आहे. यंदा आयपीएल संघामध्ये स्पर्धा वाढली आहे. आणि अशातच प्रवीण आमरे यांची नियुक्ती केल्याने दिल्लीच्या संघाला ते फायदेशीर ठरण्याची चिन्हे आहेत.
प्रवीण आमरे यांनी भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर ११ कसोटी सामने आणि ३७ वनडे सामने खेळले आहेत.
प्रवीण आमरेंनी दिली प्रतिक्रिया
या नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना आमरे म्हणाले, “मला ही संधी दिल्याबद्दल मी दिल्ली कॅपिटल संघ व्यवस्थापनाचे आभार मानतो. आयपीएल २०२० मध्ये दिल्ली कॅपिटल संघाने पहिल्यांदा अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळे मी योग्य वेळी संघात पुनरागमन करत आहे. तसेच मी रिकी पॉंटिंग आणि इतर खेळाडूंसोबत पुन्हा एकदा काम करण्यास उत्साही आहे.” दिल्ली कॅपिटल संघाचे सीईओ धीरज मल्होत्रा यांनीसुद्धा प्रवीण आमरे यांच्या संघात पुन्हा येण्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
ज्या नवदीप सैनीने सिडनीत कसोटी पदार्पण केले, त्याच्यासाठी एकवेळ भांडला होता गंभीर
… म्हणून ट्रॅविस हेडला संघात स्थान नाही, कर्णधार टीम पेनची स्पष्टोक्ती
“विराट कोहलीच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कामगिरीची पुनरावृत्ती करणे अतिशय अवघड”