आयपीएल च्या आगामी सत्राला 9 एप्रिल पासून सुरूवात होणार आहे. तत्पुर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाच्या नवीन कर्णधाराची घोषणा शुक्रवारी (26 मार्च) करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. दिल्लीचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यरला दुखापत झाल्यामुळे तो या हंगामामधून बाहेर गेला असल्याने नवीन कर्णधाराच्या नावावर चर्चा करण्यासाठी आज बैठक बोलविण्यात आली आहे.
इनसाइड स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रवर्तक किरणकुमार गांधी आणि पार्थ जिंदल हे या बैठकीत सामील असतील. याशिवाय कोच रिकी पॉन्टिंग हे सुद्धा कॉन्फरन्स कॉलद्वारेही जोडले जाणार आहेत.
यापूर्वीही अशा बातम्या आल्या होत्या की, कर्णधार होण्याच्या शर्यतीत रिषभ पंतचे नाव आघाडीवर आहे. तसेच दिल्ली संघाचे प्रवर्तक, प्रशिक्षक आणि इतर सदस्य रिषभ पंत याच्या नावास मान्यता देऊ शकतात. त्याबरोबरच इतर काही नावांवरही चर्चा केली जाऊ शकते.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रेयस अय्यर जखमी झाला होता. क्षेत्ररक्षण करताना त्याने डावाच्या आठव्या षटकात चेंडू रोखण्यासाठी सूर मारल्यामुळे त्याच्या खांद्याला दुखापत झाली. यानंतर भारतीय संघाच्या फिजिओंनी मैदानावर येऊन अय्यरला आवश्यक उपचार देऊन मैदानाबाहेर नेले. परंतु नंतर अशी बातमी आली की, अय्यरची दुखापत खूप गंभीर असल्याने तो सुमारे 4 महिने मैदानाबाहेर राहणार आहे. पण आयपीएला 9 एप्रिलपासून सुरू होत असल्याने आता दिल्लीच्या संघाला त्यांचा नवीन कर्णधार शोधावा लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
रिषभ पंतबरोबर होत असलेल्या तुलनेबाबत केएल राहुलने सोडले मौन; दिले ‘असे’ सडेतोड उत्तर
तीच धावसंख्या तोच फलंदाज! आजवर एक-दोन नव्हे ‘इतक्यांदा’ विराट वनडेत झालाय ६६ धावांवर बाद
ना विराट ना रोहित; कोणत्याही सक्रिय भारतीय फलंदाजाला न जमलेला विक्रम राहुलच्या नावावर






