---Advertisement---

दिल्ली कॅपिटल्सला आणखी एक मोठा झटका; हा अष्टपैलू क्रिकेटपटू आयपीएलमधून बाहेर

On: रविवार, मार्च 8, 2020 11:30 AM
---Advertisement---

इंग्लंड संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू क्रिस वोक्सने (Chris Woakes) येत्या इंडियन प्रीमीयर लीगच्या (आयपीएल) 13व्या हंगामातून माघार घेतली आहे. वोक्स आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचा भाग होता.

स्काय स्पोर्ट डॉट कॉमच्या वृत्तानुसार, ‘वोक्सने फ्रंचायझीला याबाबतीतची माहिती दिली आहे. त्यामुळे फ्रंचायझीने त्याच्या जागी पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे.’ वोक्सने सांगितले आहे की, तो ग्रीष्मकाळात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी स्वत:ला ताजेतवाने ठेवू इच्छित आहे. म्हणून त्याने हा निर्णय घेतला आहे.

वोक्सला आयपीएलच्या लिलावात दिल्ली कॅपिटल्सने 1.50 कोटी रूपयांना विकत घेतले होते. ही दिल्ली संघासाठी अजून एक वाईट बातमी आहे, कारण त्यांच्या संघातील दक्षिण आफ्रिका संघाचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा (Kagiso Rabada) आणि भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा (Ishant Sharma) हे दोघेही आधीपासूनच दुखापतग्रस्त आहेत.

या हंगामातील पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात मुंबई येथे पार पडणार आहे. तसेच दिल्लीचा या मोसमातील पहिला सामना 30 मार्चला किंग्स इंलेव्हन पंजाब विरुद्ध होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

१६ व्या वर्षी विश्वचषक गाजवणारी कोण आहे शेफाली वर्मा?

महिला टी२० विश्वचषकातील भारताचे टॉप ३ गोलंदाज

महिला टी२० विश्वचषकातील या आहेत भारताच्या टॉप ३ फलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---