रिषभ पंत आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार की नाही, हा प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून चाहत्यांच्या मनात आहे. मात्र आता याबाबत एक मोठी अपडेट समोर आली.
वास्तविक, दिल्ली कॅपिटल्स आयपीएल 2025 साठी रिषभ पंतला संघात कायम ठेवेल, हे निश्चित झालं आहे. त्याचबरोबर दिल्लीचा संघ स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेललाही संघात कायम ठेवेल. ‘क्रिकबझ’च्या रिपोर्टनुसार, दिल्ली कॅपिटल्स आयपीएल 2025 साठी कर्णधार रिषभ पंत आणि अक्षर पटेल यांना रिटेन करणार आहे. पंत संघाचा पहिला रिटेन्शन चॉईस असू शकतो.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) अद्याप रिटेन्शन नियम जाहीर केलेले नाहीत. परंतु दिल्ली कॅपिटल्सच्या सूत्रांनी ‘क्रिकबझ’ला सांगितलं की ,पंत फ्रँचायझीची टॉप चॉईस असेल. पंत आणि संघाचे सहमालक पार्थ जिंदाल यांच्यात मुंबईत नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. रिषभ पंतचा आयपीएलमधील पगार सध्या 16 कोटी रुपये आहे. परंतु त्याला रिटेन केल्यास आणि बीसीसीआयनं संघाच्या पर्समध्ये वाढ केल्यास हा पगार आणखी वाढू शकतो.
दिल्ली कॅपिटल्सनं पंतशिवाय आणखी काही खेळाडूंना रिटेन करण्याचा निर्णय घेतला आहे. जर बीसीसीआयनं 5 खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी दिली, तर फ्रेंचायझी अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांना संघात कायम ठेवू शकते. त्याचवेळी दिल्ली संघ जॅक-फ्रेजर मॅकगर्क आणि ट्रिस्टन स्टब्स या विदेशी खेळाडूंना रिटेन करू शकते. याशिवाय जर अनकॅप्ड खेळाडूला रिटेन करण्याची परवानगी मिळाली, तर फ्रेंचायझी अभिषेक पोरेलला संघात कायम ठेवू शकते.
दिल्ली कॅपिटल्सनं आयपीएल 2025 साठी या खेळाडूंना रिटेन करण्याचा निर्णय घेतला आहे
(1) रिषभ पंत
(2) अक्षर पटेल
(3) कुलदीप यादव
(4) ट्रिस्टन स्टब्स
(5) जेक फ्रेझर-मॅकगर्क
(6) अभिषेक पोरेल (अनकॅप्ड खेळाडूला रिटेन करण्याची परवानगी मिळाल्यास)
हेही वाचा –
केएल राहुलचा झंझावाती विक्रम, केवळ खास खेळाडूच करू शकतात अशी कामगिरी
नतमस्तक! शतक होण्यापूर्वी रिषभ पंतने केली क्रिकेटकीटची पूजा; पाहा VIDEO
सततच्या फ्लॉप शोनंतर अखेर फॉर्म आला, दुलीप ट्रॉफीत अय्यरची टी20 स्टाईल बॅटिंग