इंडियन प्रीमिअर लीग 2023मध्ये शनिवारी (दि. 1 एप्रिल) क्रिकेटप्रेमींना डबल हेडर सामन्यांची मजा लुटण्याची संधी मिळणार आहे. कारण, या दिवशी स्पर्धेचा दुसरा सामना पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळला जात आहे. तसेच, लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघातील तिसऱ्या सामन्याला 7.30 वाजता सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी उभय संघात नाणेफेक झाली. या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा सामना जिंकून विजयी सुरुवात करण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल.
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघ नवीन कर्णधारासह मैदानात उतरणार आहे. रिषभ पंत (Rishabh Pant) दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर असल्यामुळे दिल्ली संघाची धुरा डेविड वॉर्नर (David Warner) याच्याकडे आहे. दुसरीकडे, लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाचे नेतृत्व केएल राहुल (KL Rahul) याच्याकडे आहे. या सामन्यात दोन्ही कर्णधार कशाप्रकारे संघाचे नेतृत्व करतात हे पाहणेही उत्सुकतेचे ठरणार आहे. (Delhi Capitals have won the toss and have opted to field against Lucknow Super Giants in IPL 2023)
🚨 Toss Update from Lucknow 🚨@DelhiCapitals win the toss and elect to field first against @LucknowIPL.
Follow the match ▶️ https://t.co/086EqX92dA #TATAIPL#TATAIPL | #LSGvDC pic.twitter.com/dMsQFIKdXK
— IndianPremierLeague (@IPL) April 1, 2023
उभय संघाची प्लेइंग इलेव्हन
लखनऊ सुपर जायंट्स
केएल राहुल (कर्णधार), काईल मेयर्स, मार्कस स्टॉयनिस, दीपक हुड्डा, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), आयुष बदोनी, मार्क वूड, जयदेव उनाडकट, रवी बिश्नोई, आवेश खान
दिल्ली कॅपिटल्स
डेविड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, रायली रुसो, सरफराज खान (यष्टीरक्षक), रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, चेतन साकारिया, खलील अहमद, मुकेश कुमार
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘भारत खूप अहंकारी…’, आयपीएल न खेळणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंना इम्रान खानकडून धीर
‘एवढे षटकार तर मी माझ्या आख्ख्या करिअरमध्ये…’, ऋतुराजचे सिक्स पाहून भारतीय दिग्गजाचे लक्षवेधी भाष्य