इंडियन प्रीमियर लीगच्या चौदाव्या हंगामाची तयाली जोर धरू लागली आहे. सर्व संघांनी आपापल्या परीने तयारीस सुरुवात केली आहे. दिल्ली कॅपिटल संघाने नुकतीच आयपीएल 2021 साठी आपली नवीन जर्सी लॉन्च केली आहे. दिल्लीच्या टीमने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी नवीन जर्सी लॉन्च केली असून यावेळी दिल्लीचा संघ नव्या रंगात दिसणार आहे.
दिल्ली कॅपिटलच्या संघाने सामायिक केलेला व्हिडिओ खूप खास आहे. यात संघाच्या मॅनेजमेन्टने यावेळी नवी दिल्लीमधील दिल्ली कॅपिटल्स संघाच्या चाहत्यांच्या हस्ते ही जर्सी लॉन्च केली आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, चाहत्यांना फ्रँचायझीच्या कार्यालयात बोलावण्यात आले होते आणि नंतर त्यांनी नवीन जर्सी लाँच केली. विशेष म्हणजे चाहत्यांना संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि अनुभवी खेळाडू शिखर धवन यांच्याशी बोलण्याची संधीही मिळाली. या नव्या जर्सीबद्दल चाहत्यांच्या कमेंट्सही सोशल मीडियावरही येत आहेत.
यावेळी दिल्ली कॅपिटल्सची जर्सी अधिक आक्रमक करण्यात आली असून या नवीन जर्सीवर गडद निळ्या आणि लाल रंगाचा वापर केला गेला आहे. जर्सीमध्ये वाघांच्या पट्ट्यांव्यतिरिक्त, वाघाचे लाल पंजेदेखील दोन्ही बाजूंनी दर्शविलेले आहेत. टीम मॅनेजमेंटने जर्सीला नवे रुप देत आयपीएलमधील इतर संघांना आव्हान देण्यास सुरुवात केली आहे.
आयपीएल 2021 चा पहिला सामना 9 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जाईल. तर या स्पर्धेतील दिल्लीचा पहिला सामना 10 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्जबरोबर होणार आहे. यावेळी दिल्ली कॅपिटलच्या संघाने स्टीव्ह स्मिथ, उमेश यादव, रिपल पटेल, विष्णू विनोद, लुकमान मेरीवाला, एम. सिद्धार्थ, टॉम करन, सॅम बिलिंग्ज यासारख्या खेळाडूंना आपल्या ताफ्यात सामील करून संघ आणखी मजबूत बनवण्याचा प्रयत्न केला आहे.
A surprise that left these superfans and all of us like ????????
????️ | We unveiled #NayiDilliKiNayiJersey in the most wholesome way possible ????
Disclaimer: All DC staff and fans involved in this surprise were tested for COVID-19 beforehand.#YehHaiNayiDilli #IPL2021 @StayWrogn pic.twitter.com/PAygUzKWyf
— Delhi Capitals (@DelhiCapitals) March 19, 2021
आयपीएल 2021 साठीचा दिल्ली कॅपिटल संघ :
श्रेयस अय्यर (कर्णधार), शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, अक्षर पटेल, अमित मिश्रा, इशांत शर्मा, आर.अश्विन, ललित यादव, हर्षल पाटे, आवेश खान, प्रवीण दुबे, कगिसो रबाडा, एनिच नोखिया, मार्कस स्टॉइनिस, शिमरॉन हेटमायर, ख्रिस वॉक्स, डेनिअर सॅम्स, स्टीव्ह स्मिथ, उमेश यादव, रिपल पटेल, विष्णू विनोद, लुकमान मेरीवाला, एम. सिद्धार्थ, टॉम करन, सॅम बिलिंग्ज
महत्त्वाच्या बातम्या-
विराटची दुखापत ठरणार फायद्याची! रोहितच्या नेतृत्त्वाखाली भारत जिंकणार अंतिम टी२० लढत?
“टी२० विश्वचषकात आम्हाला मोठमोठे संघही घाबरतील,” इंग्लंडच्या प्रशिक्षकाची चेतावणी
सूर्यकुमार-इशानच्या आंतरराष्ट्रीय यशामध्ये आयपीएलचे मोठे योगदान; भारतीय दिग्गजाचे महत्त्वपुर्ण विधान






