भारतात गेल्या वर्षभरापासून हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरसचा फटका इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामालाही जोरदार बसला. गेल्या २ दिवसात अनेक संघांचे काही खेळाडू तसेच संघाशी निगडीत सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर अखेर मंगळवारी (४ मे) आयपीएल २०२१ हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला. दरम्यान, आता असे वृत्त समोर येत आहे की दिल्ली कॅपिटल्सचा दिग्गज गोलंदाज अमित मिश्राला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
अमित मिश्राचा कोरोना अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर तातडीची बैठक घेत आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने हा हंगाम तात्काळ स्थगित केला.
पण आता दिल्ली कॅपिटल्सने अमित मिश्राबद्दल माहिती देताना ट्विट केले आहे की ‘फिरकीपटू अमित मिश्रा कोविड-१९ पॉझिटिव्ह आढळला आहे. त्याला बीसीसीआय आणि आयपीएलच्या नियामांनुसार एका मेडिकल केअर फॅसिलिटीमध्ये घेऊन जाण्यात आले आहे. दिल्ली कॅपिटल्सचे वैद्यकीय पथक सतत मिश्राच्या संपर्कात आहे आणि त्याची सुरक्षा सुनिश्चित करत आहे. आम्ही प्रार्थना करतो की तो लवकर बरा होईल.’
???? OFFICIAL STATEMENT ????
Delhi Capitals leg spinner Amit Mishra has tested positive for COVID-19. He has been moved to a designated medical care facility, as per BCCI & IPL guidelines. pic.twitter.com/Dp5eZHuBBZ
— Delhi Capitals (@DelhiCapitals) May 4, 2021
खरंतर सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स संघातील वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर या दोन खेळाडूंचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर लगेचच दिल्ली कॅपिटल्स संघालाही आयसोलेशनमध्ये जाण्यास सांगितले होते. कारण या दोन संघांमध्ये २९ एप्रिल रोजी अहमदाबादमध्ये सामना झाला होता. यानंतर दिल्ली संघातील खेळाडूंची चाचणी करण्यात आली, त्यात मिश्राचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर मंगळवारी रात्री उशीरा दिल्लीने मिश्राला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्याची माहिती दिली.
The Delhi Capitals medical team is in constant touch with Mishra, and ensuring his safety and well-being. We wish him a speedy recovery ????
— Delhi Capitals (@DelhiCapitals) May 4, 2021
मिश्राबरोबरच मंगळवारी सनरायझर्स हैदराबादचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाचा देखील कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच चेन्नई सुपर किंग्सचा फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसी देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळला.
एवढेच नाही तर सोमवारी कोलकाताच्या वरुण आणि संदीप या खेळाडूंशिवाय चेन्नईचा गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि चेन्नई संघाची बस सफाई करणारा कर्मचारी त्याचबरोबर अरुण जेटली स्टेडियममधील ५ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे कोरोना व्हायरसचा संघांच्या बायोबबलमध्ये झालेला शिरकाव पाहाता अखेर हा हंगाम स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआय आणि आयपीएलला घ्यावा लागला.
Official Announcement!#WhistlePodu #Yellove ???????? pic.twitter.com/45mWyu8ySn
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 4, 2021
अमित मिश्राची आयपीएलमध्ये शानदार कामगिरी
आयपीएलमध्ये आत्तापर्यंत अमित मिश्राची कामगिरी शानदार राहिली आहे. त्याने १५४ सामन्यात २३.९७ च्या सरासरीने १६६ विकेट्स घेतल्या आहेत. तो आयपीएलमध्ये लसिथ मलिंगानंतर सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. तसेच आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा हॅट्रिक घेण्याचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे. त्याने ३ वेळा आयपीएलमध्ये हॅट्रिक घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२१ स्थगित होताच सोशल मीडियावर मीम्सचा सुळसुळाट; आरसीबी झाली सर्वाधिक ट्रोल
घरी परत जाण्याचा मार्ग शोधण्यासाठी ऑस्ट्रेलियन खेळाडू, प्रशिक्षक आणि समालोचक ‘या’ देशात होणार रवाना?
चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूची संवेदनशीलता, भारताला केली कोरोनाविरोधी लढ्यासाठी ‘ही’ मदत






