इंडियन प्रीमिअर लीग 2023मध्ये शनिवारी (1 एप्रिल) दिवसातील दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स यांच्या दरम्यान खेळला गेला. लखनऊ येथील इकाना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दोन्ही संघ विजयी सलामी देण्याच्या इराद्याने मैदानात उतरले. आपला नियमित कर्णधार रिषभ पंत याच्या अनुपस्थितीत खेळत असलेल्या दिल्लीने या सामन्यावेळी केलेल्या एका कृतीने सर्वांची मने जिंकली.
या हंगामात दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघ नवीन कर्णधारासह मैदानात उतरला आहे. रिषभ पंत (Rishabh Pant) दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर असल्यामुळे दिल्ली संघाची धुरा डेव्हिड वॉर्नर (David Warner) याच्या खांद्यावर असेल. रिषभ संघासोबत नसला तरी दिल्ली कॅपिटल्स संघ व्यवस्थापनाने त्याची आठवण म्हणून त्याची 17 क्रमांकाची जर्सी आपल्या डग डाऊटमध्ये लावली. या कृतीनंतर दिल्ली संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Always in our dugout. Always in our team ❤️💙#YehHaiNayiDilli #IPL2023 #LSGvDC #RP17 pic.twitter.com/8AN6LZdh3l
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 1, 2023
मागील वर्षी डिसेंबरच्या अखेरीस रुडकी येथे जाताना रिषभ पंत कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. तेव्हापासून तो उपचार घेत आहे. तसेच, तो क्रिकेटपासूनही दूर आहे. त्याच्या तब्येतीमध्ये हळूहळू सुधारणा होत असून, आगामी विश्वचषकापर्यंत तो तंदुरुस्त होण्याची शक्यता आयपीएलच्या काही सामन्यांमध्ये तो दिल्लीच्या डग आऊटमध्ये दिसू शकतो असे सुतवाच दिल्ली संघ व्यवस्थापनाकडून करण्यात आले होते. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
आयपीएलच्या या हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्सने कर्णधार म्हणून डेव्हिड वॉर्नर तर उपकर्णधार म्हणून अक्षर पटेल यांच्यावर जबाबदारी दिली गेलीये. त्याचबरोबर रिषभचा बदली खेळाडू म्हणून बंगालच्या अभिषेक पोरेल याचा दिल्ली संघात समावेश केला गेलाय.
(Delhi Capitals Nice Gesture Rishabh Pant Jersey In Delhi Capitals Dug Out)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
खेळाडूंपाठोपाठ कोच लक्ष्मणही महाकालेश्वराच्या पायाशी! सहकुटुंब घेतले दर्शन,छायाचित्रे व्हायरल
टॉस जिंकत दिल्लीचा बॉलिंगचा निर्णय, रिषभ पंतच्या अनुपस्थितीत वॉर्नर लढवणार किल्ला