---Advertisement---

सपशेल फ्लॉप ते सुपरहिट! सीएसकेला चोप चोप चोपणाऱ्या पृथ्वी शॉला कसा गवसला सूर? वाचा

On: रविवार, एप्रिल 11, 2021 1:23 PM
---Advertisement---

दिल्ली कॅपिटल्सचा आक्रमक युवा सलामी फलंदाज पृथ्वी शॉने आयपीएल 2021 च्या दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 72 धावांची ताबडतोड खेळी केली. ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर ऍडलेड कसोटीत झालेल्या भारताच्या पराभवानंतर त्याला संघातून वगळण्यात आले होते. त्या कसोटी सामन्यातील दोन्ही डावात त्याने केवळ चार धावा केल्या होत्या.

पण या 21 वर्षीय खेळाडूने हार न मानता भारतात येऊन फलंदाजीचे धडे गिरवण्यास सुरूवात केली आणि त्याच्या या मेहनतीचा परिणामही दिसून आला. त्यामध्ये प्रथम विजय हजारे ट्रॉफीच्या एका मोसमात 800 धावा करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आणि त्यानंतर आता त्याने आयपीएलच्या पहिल्या सामन्यामध्येही चमकदार कामगिरी केली आहे.

शनिवार (10 एप्रिल) रोजी चेन्नईविरुद्ध त्याने अवघ्या 38 चेंडूत 72 धावा केल्या. यामध्ये त्याने 9 चौकार आणि 3 षटकार खेचले आणि यामध्ये त्याचा स्ट्राइक रेटही 190 च्या जवळपास होता. त्याने आपले अर्धशतक केवळ 27 चेंडूत आपले पूर्ण केले होते.

सामना संपल्यानंतर तो म्हणाला की, “आमचा विजय झाल्यामुळे मला खूप भारी वाटत आहे. या विजयामध्ये प्रत्येकाने मोलाचे योगदान दिले. दुसऱ्या डावात फलंदाजीचा निर्णय चांगला होता. कारण चेंडू बॅटवर येत होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारतीय संघाबाहेर झाल्यानंतर मी प्रवीण आमरे सरांकडे गेलो आणि माझ्या फलंदाजीविषयी चर्चा केली. त्यानंतर मी काही देशांतर्गत सामने खेळले, ज्याचा मला खूप फायदा झाला. मी पुनरागमन करू शकलो याचा मला खूप आनंद होत आहे.”

विजय हजारे ट्रॉफी २०२१ मध्ये त्याने 165.40 च्या सरासरीने 827 धावा केल्या होत्या. त्यामध्ये त्याचा स्ट्राइक रेट 138.29 एवढा होता.

तसेच पृथ्वी पुढे म्हणाला की, “विजय हजारे स्पर्धेत जाण्यापूर्वी मी एक चांगली योजना आखली होती. त्यामुळे भारतीय संघातून काढून टाकण्याबद्दल विचार करण्याची माझी इच्छा पण नव्हती. कारण तो क्षण माझ्यासाठी निराशाजनक क्षण होता. पण आता मला पुढे जावे लागेल आणि माझ्या फलंदाजीत काही कमतरता असेल त्यात सुधारणा करणे माझ्यासाठी आवश्यक आहे.”

पृथ्वीची गेल्यावर्षीच्या आयपीएल हंगामामधील कामगिरी काही खास राहिली नव्हती. परंतु यंदा पहिल्या सामन्यात त्याची फलंदाजी पाहता, हा खेळाडू आयपीएल 2021 मध्ये आपली छाप पाडण्यास उत्सुक असल्याचे दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

फाफ डू प्लेसिस, एमएस धोनीसारख्या दिग्गजांना शून्यावर धाडलं तंबूत; कोण आहे तो अवलिया? काय त्याची खासियत?

बेटे शेर हो तुम, मौज कर दी..! विजयानंतर धवनकडून शॉचे विशेष अंदाजात कौतुक, पाहा धमाल व्हिडिओ 

आज वॉर्नर-मॉर्गनमध्ये होणार काट्याची टक्कर; ‘अशी’ असेल SRH आणि KKR ची प्लेइंग इलेव्हन?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---