---Advertisement---

DCला कोरोनाचा फटका; २.२० कोटींचा दिग्गज हंगाम अर्ध्यात सोडून मायदेशी परतण्याच्या तयारीत!

On: मंगळवार, एप्रिल 27, 2021 1:12 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ च्या हंगामावरील संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. कोरोनाच्या सावटाखाली बंद दाराआड आयोजन्यात आलेल्या या हंगामातून आतापर्यंत बऱ्याच परदेशी आणि भारतीय क्रिकेटपटूंनी माघार घेतली आहे. भारतातील कोरोनाचा वाढता प्रकोप हे यामागचे मुख्य कारण ठरले आहे. आता याच कारणास्तव अजून दिल्ली कॅपिटल्स संघाचा दिग्गज फलंदाज स्टिव्ह स्मिथ आयपीएलचा चौदावा हंगाम अर्ध्यात सोडून मायदेशी परतू शकतो.

ऑस्ट्रेलियन सरकारच्या निर्णयामुळे स्मिथ अडकला संकटात
माध्यमांतील वृत्तांनुसार, नव्याने दिल्ली संघात सहभागी झालेला ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू स्मिथ हंगामाच्या अर्ध्यातून ऑस्ट्रेलियाला परतू शकतो. यापुर्वी ऑस्ट्रेलियाच्या ३ क्रिकेटपटूंनी उर्वरित हंगामातून माघार घेतली आहे. यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे खेळाडू ऍडम झम्पा, केन रिचर्डसन आणि राजस्थान रॉयल्सचा अँड्र्यू टाय यांचा समावेश आहे.

ऑस्ट्रेलियाच्या ९ न्यूजमधील वृत्तानुसार, भारतातील कोरोनाची स्थिती पाहता ऑस्ट्रेलियन सरकारने भारतातील विमाने रद्द केली आहेत. लवकरच भारतातून येणाऱ्या प्रवासींसाठी ऑस्ट्रेलियाच्या सीमारेषा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे स्मिथसह इतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मायदेशी परतण्याची शक्यता आहे.

एवढेच नव्हे तर, क्रिकेटपटूंव्यतिरिक्त प्रशिक्षक, समालोचक आणि इतर पदभार सांभाळत आयपीएल २०२१ चा भाग असलेले ३० ऑस्ट्रेलियन सदस्य भारत सोडण्यासाठी इच्छुक आहेत. असे झाल्यास, दिल्ली संघ आणि आयपीएलला मोठा धक्का बसू शकतो.

दिल्ली कॅपिटल्सला होणार २.२० कोटींचे नुकसान
नुकतीच दिल्लीचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विनने कोरोनाच्या कारणामुळे उर्वरित हंगाम न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. हंगामाची सुरुवात होण्यापुर्वी दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर दुखापती झाला होता. त्यामुळे तोदेखील या हंगामाला मुकला आहे. अशात स्मिथसारखा अनुभवी फलंदाजाने माघार घेतल्यास दिल्ली संघ अडचणीत सापडू शकतो.

आयपीएल २०२१ लिलावात तब्बल २.२० कोटींची किंमत दिल्लीने स्मिथला आपल्या ताफ्यात सहभागी केले होते. भलेही स्मिथने आतापर्यंत दिल्लीकडून ३ सामने खेळताना अवघ्या ७६ धावा केल्या आहेत. परंतु आगामी सामन्यात त्याला सूर गवसल्याने तो दिल्ली संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

अद्याप स्मिथने अर्ध्यात आयपीएल २०२१ चा हंगाम सोडण्याबाबत कसलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे तो नक्की कोणता निर्णय घेईल? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

बीसीसीआयवर आयपीएल इतिहासातील सर्वात मोठं संकट ओढावलं, ३० ऑस्ट्रेलियन स्वदेशी परतणार?

सनराझर्समागचं दृष्टचक्र संपेना, संघ पिछाडीवर असताना कर्णधार उर्रवित हंगामातून घेणार माघार?

आयपीएल संपल्यावर घरी परतण्यासाठी चार्टर्ड प्लेनची व्यवस्था करा, MIच्या ‘या’ खेळाडूची ऑस्ट्रेलिया बोर्डाला मागणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---