आगामी आयपीएल हंगामाची सर्व चाहत्यांना आतुरता लागली असेल. आता सर्व संघ इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 18व्या हंगामासाठी सज्ज आहेत. आगामी हंगामासाठी जेद्दाह येथे एक मेगा लिलाव आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये प्रत्येक संघाने त्यांच्या आवडीचे आणि गरजेचे खेळाडू विकत घेतले. लिलाव झाल्यापासून प्रत्येक संघाबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. तत्पूर्वी या बातमीद्वारे आपण दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाबद्दल जाणून घेऊया. ज्यांची प्लेइंग इलेव्हन अतिशय मजबूत स्थितीत दिसत आहे.
आयपीएलच्या (IPL 2025) मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्सने फाफ डू प्लेसिस, दुष्मंथा चमीर, डोनावन फेरेरिया, मोहित शर्मा, समीर रिझवी आणि करूण नायर यांसारख्या अनेक स्टार खेळाडूंना खरेदी केले आहे. पण ही अशी नावे आहेत ज्यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणे कठीण आहे. कारण या संघात एकापेक्षा एक विस्फोटक खेळाडू आहेत.
आयपीएल 2025 साठी दिल्ली कॅपिटल्सच्या (DC) प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलायचे झाले, तर ऑस्ट्रेलियाचा युवा प्रतिभावान खेळाडू जॅक फ्रेझर मॅकगर्क (Jake Fraser-McGurk) डावाची सुरुवात करताना दिसू शकतो. त्याच्यासोबत केएल राहुल (KL Rahul) सलामीला येईल. राहुलकडे संघाची कमानही येऊ शकते. यानंतर अभिषेक पोरेल (Abishek Porel) पुन्हा एकदा तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसू शकतो.
इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज हॅरी ब्रूक (Harry Brook) चौथ्या क्रमांकावर तर दक्षिण आफ्रिकेचा ट्रिस्टन स्टब्स (Tristan Stubbs) पाचव्या क्रमांकावर खेळताना दिसू शकतो. यानंतर आशुतोष शर्मा सहाव्या क्रमांकावर तर अक्षर पटेल (Axar Patel) सातव्या क्रमांकावर खेळण्याची शक्यता आहे. मिचेल स्टार्क (Mitchell Starc), कुलदीप यादव (Kuldeep Yadav), टी नटराजन आणि मुकेश कुमार गोलंदाजी विभाग सांभाळू शकतात.
दिल्ली कॅपिटल्सची (Delhi Capitals) संभाव्य प्लेइंग इलेव्हन- जॅक फ्रेझर मॅकगर्क, केएल राहुल, अभिषेक पोरेल, हॅरी ब्रूक, ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, अक्षर पटेल, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, टी नटराजन, मुकेश कुमार
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs AUS; ऑस्ट्रेलिया संघात पडली फूट? स्टार खेळाडूच्या वक्तव्यानं उडाली खळबळ
चांगल्या कामगिरीचं बक्षीस मिळालं! आयसीसी रँकिंगमध्ये कोहली-जयस्वालची मोठी झेप
जसप्रीत बुमराहला तोड नाही! आयसीसी रँकिंगमध्ये अव्वल स्थानी झेप; टॉप 10 मध्ये आणखी दोन भारतीय