इंडियन प्रीमियर लीग 2020 मध्ये रविवारी (8 नोव्हेंबर) दुसरा क्वालिफायर सामना खेळला गेला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादचा 17 धावांनी पराभव केला. या विजयासह दिल्लीने अंतिम फेरीत प्रवेश केला. एवढंच नव्हे, तर दिल्लीला अंतिम सामन्यात प्रवेश करायला तब्बल 13 वर्षे प्रतीक्षा करावी लागली. या लेखात आपण दिल्लीचा आयपीएल इतिहासातील प्रवास पाहाणार आहोत.
आयपीएल 2019 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने तब्बल सात वर्षांनंतर प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केले होते. सन 2012 मध्ये दिल्लीला प्लेऑफमध्ये मजल मारता आली होती. सन 2018 च्या आयपीएल हंगामाच्या मध्यावर श्रेयस अय्यर याला या संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले होते. तसेच 2019 च्या हंगामापासून दिल्ली फ्रेंचायझीचे नाव दिल्ली डेअरडेव्हिल्स ऐवजी दिल्ली कॅपिटल्स ठेवण्यात आले होते. त्यानंतर आता सलग 2 वर्षे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉंटिंग यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीने प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता.
दिल्लीचा गेल्या 13 वर्षातील प्रवास –
आयपीएल 2008 – उपांत्य फेरी
आयपीएल 2009 – उपांत्य फेरी
आयपीएल 2010- 5 वे स्थान
आयपीएल 2011- 10 वे स्थान
आयपीएल 2012 – उपांत्य फेरी
आयपीएल 2013 – 9 वे स्थान
आयपीएल 2014 – 8 वे स्थान
आयपीएल 2015 – 7 वे स्थान
आयपीएल 2016 – 6 वे स्थान
आयपीएल 2017- 6 वे स्थान
आयपीएल 2018- 8 वे स्थान
आयपीएल 2019- 7 वे स्थान
दिल्लीकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज
शिखर धवन: दिल्लीचा सलामीवीर शिखर धवनने या हंगामात शानदार कामगिरी केली आहे. या हंगामात त्याने सलग दोन शतकेही ठोकली. त्याने 16 सामन्यांत 46 च्या सरासरीने 603 धावा फटकावल्या आहेत. दोन शतके वगळता त्याने चार अर्धशतके झळकावली आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो पंजाबचा कर्णधार केएल राहुलनंतर दुसर्या क्रमांकावर आहे.
दिल्लीकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज
कागिसो रबाडा: हैदराबादविरुद्धच्या सामन्यात कागीसो रबाडाने 19 व्या षटकात तीन बळी घेतले आणि सामन्याचे चित्रच बदलले. यानंतर हा अटीतटीचा सामना दिल्लीच्या बाजूने वळला. या शानदार गोलंदाजीनंतर रबाडाने पर्पल कॅपही मिळवली आहे. 16 सामन्यांनंतर त्याने 29 बळी घेतले आहेत. या शर्यतीत मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह 27 बळींसह दुसऱ्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ खेळाडूची केएल राहुलच्या ऑरेंज कॅपवर नजर, तर रबाडा-बुमराहमध्ये पर्पल कॅपसाठी चूरस
Video – श्रेयस अय्यर विसरला आपल्याच संघातील खेळाडूचे नाव, वॉर्नरने करुन दिली आठवण
….म्हणून मार्कस स्टॉयनिसला सलामीला पाठवले, श्रेयस अय्यरने केला खुलासा
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२०च्या प्राईझ मनीमध्ये मोठी घट; विजेत्या आणि उपविजेत्या संघांना मिळणार ‘इतके’ रुपये
लईच वाईट! आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून ‘फ्लॉप’ ठरलेले ३ भारतीय खेळाडू
RCB च्या कर्णधारपदी कुणाची लागू शकते वर्णी? ही ३ नावे चर्चेत