---Advertisement---

दिल्ली कॅपिटल्सला हवा ‘गौतम गंभीर’, ‘दादा’चा मुख्य प्रशिक्षकपदाचा दावा फेटाळला

On: मंगळवार, जुलै 16, 2024 6:02 PM
Sourav Ganguly
---Advertisement---

दिल्ली कॅपिटल्सनं रिकी पाँटिंगची मुख्य प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी केली आहे. आता फ्रॅन्चाईझी आयपीएल 2025 साठी नव्या मुख्य प्रशिक्षकाच्या शोधात आहे. सध्या सौरव गांगुली संघासोबत आहेत, परंतु दिल्ली कॅपिटल्स त्यांच्याकडे मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सोपवणार नाही. खुद्द गांगुलीला संघाचा मुख्य प्रशिक्षक बनण्यात रस आहे, परंतु दिल्ली कॅपिटल्सचे मालक गौतम गंभीरसारख्या एखाद्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

सौरव गांगुलीनं अद्याप कोणत्याही संघाचं मुख्य प्रशिक्षकपद सांभाळलेलं नाही. क्रिकेट सोडल्यानंतर तो बराच काळ प्रशासनात होता. गांगुली बंगाल क्रिकेट असोसिएशन आणि त्यानंतर बीसीसीआयचा अध्यक्ष राहिला. त्यानंतर तो आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा मार्गदर्शक बनला. तसेच तो फ्रँचायझीचा जागतिक क्रिकेट संचालकही आहे. बंगाली वृत्तपत्र ‘आज कल’ला दिलेल्या मुलाखतीत गांगुलीनं मुख्य प्रशिक्षक बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु आता रिपोर्टनुसार, दिल्ली कॅपिटल्स दुसऱ्या एखाद्या अनुभवी व्यक्तीच्या शोधात आहे.

वृत्तानुसार, दिल्ली कॅपिटल्स गांगुलीकडे क्रिकेट संचालक आणि मुख्य प्रशिक्षक या दोन्ही जबाबदारी सोपवू इच्छित नाही. गांगुली सध्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स, ILT20 मध्ये दुबई कॅपिटल्स आणि SA20 लीगमधील प्रिटोरिया कॅपिटल्सचा क्रिकेट संचालक आहे. “गांगुलीकडे आधीपासूनच भरपूर काम आहे. क्रिकेट संचालक म्हणून फ्रॅन्चाईझीसाठी बऱ्याच गोष्टींची योजना करणं हे त्याचं काम आहे,” असं एका सूत्रानं सांगितलं.

गौतम गंभीर सारख्या एखाद्या व्यक्तीची मुख्य प्रशिक्षक म्हणून नेमणूक करावी, अशी दिल्ली कॅपिटल्सची इच्छा असल्याचं सूत्रानं सांगितलं. सूत्र म्हणाला, “संघाला अशा प्रशिक्षकाची गरज आहे जो खूप सक्रिय असेल. तसेच तो गौतम गंभीरप्रमाणे आक्रमक असेल. ही काही आश्चर्याची गोष्ट नाही की तो (गंभीर) एवढा यशस्वी आहे. तो खेळाडूंवर लक्ष ठेवतो, मग तो आंतरराष्ट्रीय असो किंवा राष्ट्रीय.”

महत्त्वाच्या बातम्या – 

यष्टीरक्षक रिषभ पंत सीएसकेत घेणार धोनीची जागा? आयपीएल 2025 मध्ये होऊ शकतो मोठा फेरबदल
एकेकाळी होते टीम इंडियाचे मॅचविनर खेळाडू…आता संधीसाठी झगडत आहेत! निवृत्ती हाच शेवटचा पर्याय
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत भारतासाठी ओपनिंग कोण करणार? हे 4 दावेदार रेसमध्ये

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---