वुमन्स प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. पहिलाच सामना गतविजेता मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होत आहे. नाणेफेकीचा कौल मुंबई इंडियन्सच्या बाजूने लागला आणि हरमनप्रीत कौर हीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीने 20 षटकात 5 बाद 171 धावांचा डोंगर ऊभा केला आहे.
याबरोबरच उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. बॉलीवूडचा मेगास्टार शाहरुख खानने यात परफॉर्म केले. याचबरोबर शाहिद कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, कार्तिक आर्यन आणि वरुण धवन यांनीही आपल्या अदाकारीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), अमेलिया केर, अमनजोत कौर, एस सजना, पूजा वस्त्राकर, शबनीम इस्माईल, कीर्थना बालकृष्णन, सायका इशाक.
दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): शफाली वर्मा, मेग लॅनिंग (कर्णधार), ॲलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्ज, मारिझान कॅप, एनाबेल सदरलँड, अरुंधती रेड्डी, मिन्नू मणी, तानिया भाटिया (विकेटकीपर), राधा यादव, शिखा पांडे.
महत्वाच्या बातम्या –






