---Advertisement---

WPL 2024 : डब्ल्यूपीएलच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय

On: शुक्रवार, फेब्रुवारी 23, 2024 7:36 PM
---Advertisement---

महिला प्रीमियर लीगचा दुसरा हंगाम २३ फेब्रुवारीपासून रंगतदारपणे सुरू होणार आहे. या काळात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी महिला प्रीमियर लीगमध्ये परफॉर्म केला आहे. तसेच पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्समध्ये होणार आहे. महिला प्रीमियर लीगचा आतापर्यंत फक्त एकच हंगाम खेळला गेला आहे. पहिल्या सत्रात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये 3 सामने झाले. त्यापैकी मुंबई इंडियन्सने 2 आणि दिल्ली कॅपिटल्सने एक जिंकला होता. 

याबरोबरच, आज म्हणजेच 23 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजता दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात पहिला सामना होणार आहे. पहिल्या सामन्यात, मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स आणि हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स दोन्ही सामने जिंकून विजयासह WPL 2024 ची चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न असणार आहे. तसेच या सामन्यात मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, महिला प्रीमियर लीग 2024 सुरू होण्यापूर्वी बॉलिवूड स्टार्सनीही आपली जादू दाखवली आहे. यामध्ये शाहरुख खान, वरुण धवन, टायगर श्रॉफ, शाहिद कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांनी धूम ठोकली. या दिग्गज स्टार्सची दमदार कामगिरी पाहून चाहते खूप खूश झाले. तर महिला प्रीमियर लीग 2024 मध्ये या स्टार्सच्या कामगिरीने ही लीग आणखी संस्मरणीय बनवली होती. उद्घाटन समारंभानंतर चाहते आता मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्याचा आनंद घेतील.

मुंबई इंडियन्स प्लेईंग 11
हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), अमेलिया केर, अमनजोत कौर, एस सजना, पूजा वस्त्राकर, शबनीम इस्माईल, कीर्तन बालकृष्णन, सायका इशाक.

दिल्ली कॅपिटल्स प्लेईंग 11
शफाली वर्मा, मेग लॅनिंग (कर्णधार), ॲलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, ॲनाबेल सदरलँड, अरुंधती रेड्डी, मिन्नू मणी, तानिया भाटिया (विकेटकीपर), राधा यादव, शिखा पांडे.

महत्वाच्या बातम्या – 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---