---Advertisement---

कॅप्टन कूलच्या रांचीत रोहितचा पारा चढला वर, भर मैदानात नक्की काय म्हणाला? वाचा सविस्तर

On: शुक्रवार, फेब्रुवारी 23, 2024 6:00 PM
---Advertisement---

रांची येथील चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याची निर्णय घेतला. पहिल्या दिवसअखेर इंग्लंडने 7 बाद 302 धावा केल्या आहेत. प्रथम फलंदाजी करणाऱ्या आकाश दीपने सुरूवातीला इंग्लंडला धक्के दिल्याने त्यांची अवस्था 3 बाद 57 धावा अशी झाली होती. मात्र जो रूटने झुंजार शतक ठोकत इंग्लंडचा डाव सावरला आहे.

याबरोबरच, रूटने दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडला 302 धावांपर्यंत पोहचवले. इंग्लंडकडून रूटने नाबाद 106 धावा तर झॅक क्राऊलीने 42 आणि बेन फोक्सने 47 धावांची खेळी केली. त्यानंतर ओली रॉबिन्सनने नाबाद 31 धावा करत रूटला चांगली साथ दिली. भारताकडून आकाश दीपने 3 तर मोहम्मद सिराजने 2 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच इंग्लंडचा फलंदाज जो रूट संपूर्ण मालिकेत चमकला नव्हता. मात्र महत्वाच्या चौथ्या सामन्यात 31 वे कसोटी शतक केले आहे. मात्र  रोहित इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीतील पहिल्या दिवशी हा अंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळाला. नक्की कशामुळे रोहित खवळला? मैदानात नक्की असं काय झालं? हे आपण जाणून घेणार आहोत.

तसेच रवींद्र जडेजाच्या बॉलिंगवर टीम इंडियाने इंग्लंडच्या जो रुट याच्या विरोधात रीव्हीव्यू घेतला. सर्व तिसऱ्या अंपायरच्या निर्णयाची प्रतिक्षा करत होते. अंपायरचा निर्णय काय असणार? याबाबत प्रत्येकाला उत्सूकता होती. हा निर्णय स्टेडियममधील मोठ्या स्क्रिनवर दाखवला जातो. मात्र या वेळेस रोहित शर्माला बिग स्क्रीनवर दाखवण्यात आलं. स्वत:ला बिग स्क्रीनवर पाहून रोहितचा पारा चांगलाच चढला आहे.

https://twitter.com/love_ict/status/1760948704872112399

दरम्यान, रोहितचा सामन्यादरम्यान मैदानात आणि मैदानाबाहेर वावरण्याचा अंदाज, बोलण्याची पद्धत आणि मनात ते ओठात असा सरळसाधा आणि रोखठोक स्वभाव प्रत्येक क्रिकेट चाहत्याला माहित आहे. एखाद्या खेळाडू किंवा आपल्या टीमला गाईड करताना बोलण्याची स्टाईल आणि त्याचे हातवारे, या पद्धतीमुळे रोहित प्रत्येकाला आपल्यातलाच वाटत असतो.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.

इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कर्णधार) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टले, ओली रॉबिन्सन, जेम्स एंडरसन आणि शोएब बशीर.

महत्वाच्या बातम्या – 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---