---Advertisement---

आयपीएल 2024 मध्ये ऋषभ पंत विकेटकिपिंग करणार की नाही? दिल्ली कॅपिटल्सच्या मालकाने रहस्य केले उघड

On: शुक्रवार, फेब्रुवारी 23, 2024 6:48 PM
Rishabh Pant
---Advertisement---

बीसीसीआयने गुरुवारी 22 फेब्रुवारीला आयपीएल 2024 च्या पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचा हा पहिला टप्पा जाहीर करण्यात आला आहे. तर वेळापत्रकात एक गोष्ट पूर्णपणे वेगळी होती. ती म्हणजे दिल्ली कॅपिटल्स संघ आपले पहिले दोन घरचे सामने विशाखापट्टणम येथे खेळणार आहे. तसेच गेल्या हंगामापर्यंत दिल्लीचे अरुण जेटली स्टेडियम हे कॅपिटल्सचे होम ग्राउंड होते.  

अशातच दिल्ली कॅपिटल्स आपला एकही सामना होम ग्राऊंड अरूण जेटली स्टेडियमवर खेळणार नाहीये. त्यामुळे ऋषभ पंतचे पुनरागमन हे दिल्लीत नाही तर मोहालीत होण्याची शक्यता आहे.दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियम यावेळी उपलब्ध होण्याची शक्यता नाही. कारण अरूण जेटली स्टेडियमवर वुमन प्रीमियर लीगचा अंतिम सामना होणार आहे.

तसेच दिल्ली कॅपिटल्सचा पहिला सामना हा 23 मार्चला पंजाब किंग्जविरूद्ध होत आहे. हा सामना मोहालीत होणार आहे. तर दिल्लीचा दुसरा सामना हा राजस्थान रॉयल्सविरूद्ध जयपूरमध्ये 28 मार्चला होणार आहे. तर 31 मार्चला चेन्नईविरूद्ध विशाखापट्टणममध्ये होणार आहे. तसेच 3 एप्रिलला देखील दिल्ली कॅपिटल्स विशाखापट्टणम येथे खेळणार आहे. हा सामना केकेआर विरूद्ध होईल. तसेच 7 एप्रिलला दिल्ली अन् मुंबई वानखेडेवर भिडणार आहेत.

याबरोबरच पार्थ जिंदाल म्हणाले की, संघ संचालक सौरव गांगुली आणि प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांच्या थिंक टँकला पंतच्या पुनरागमनाबद्दल विश्वास आहे. मात्र, अद्याप बीसीसीआयकडून परवानगी मिळणे बाकी आहे. जिंदाल म्हणाला, ‘ऋषभ फलंदाजी करत आहे, त्याने धावाही सुरू केले असून.तो आयपीएलसाठी पूर्णपणे तंदुरुस्त असेल. मला पंतकडून खेळण्याची अपेक्षा आहे आणि तो पहिल्या सामन्यापासून संघाचे नेतृत्व करेल. त्याने यष्टिरक्षणालाही सुरुवात केली आहे. पण पहिल्या सात सामन्यांमध्ये तो फक्त फलंदाजी करणार आहे.

दरम्यान, ऋषभ पंत बरोबरच वेगवान गोलंदाज एनरिक नोरखिया ​​आता 80% तंदुरुस्त आहे, परंतु स्पर्धेच्या सुरुवातीपर्यंत तो पूर्णपणे तंदुरुस्त होण्याची शक्यता आहे. दिल्लीच्या विशाखापट्टणम येथील सराव शिबिरात नोरखियाही सहभागी होण्याची शक्यता आहे. तसेच एनरिक नॉर्खिया मांडीच्या दुखापतीतून सध्या सावरत आहे. तर गेल्या वर्षी त्याने दिल्लीकडून 14 पैकी 10 सामन्यात सहभागी झाला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---