नुतन बुद्धिबळ मंडळ, सांगली यांच्या तर्फे आयोजित व जेकेज एक्सलंस चेस अकादमी यांच्या सहकार्याने अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना(एआयसीएफ) आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना(एमसीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 55व्या बाबुकाका शिरगांवकर मेमोरियल खुल्या फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत पश्चिम बंगालच्या मित्रभा गुहा याने अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले.
गुलमोहर हॉल, अभिरुची मॉल, पुणे येथे पार पडलेल्या या स्पर्धेत नवव्या फेरीत पश्चिम बंगालच्या मित्रभा गुहाने तामिळनाडूच्या वेंकटेश एमआरला बरोबरीत रोखले. 23 वर्षीय मित्रभा याने इंग्लिश ओपनिंग पद्धतीने सुरुवात करत वेंकटेशला 25 चालींमध्ये बरोबरीत रोखले. मित्रभाने 53.5 बुकोल्स कट गुणसरासरीच्या जोरावर व 8 गुणांसह अव्वल क्रमांक पटकावला. तर, तामिळनाडूच्या वेंकटेश एमआर याने ५१.५ बुकोल्स कट गुणसरासरीच्या जोरावर दुसरा क्रमांक पटकावला. कोल्हापूरच्या सम्मेद शेटेने आकाश दळवीचा पराभव करून तिसरे स्थान पटकावले.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला करंडक व 60,000/-रुपये, तर उपविजेत्या खेळाडूस करंडक व 40000/-रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण दोन वेळा छत्रपती शिवाजी पुरस्कार विजेते जयंत गोखले, यशदाचे उपसंचालक शेखर गायकवाड, वंदना गायकवाड, उद्योजक कुमार लागू, रमा लागू, सीए किशोर गुजर दिलीप कोटीभास्कर, राजेंद्र कोंडे,यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नूतन बुध्दिबळ मंडळाचे उपाध्यक्ष चिदंबर कोटीभास्कर, संजय केडगे, चिंतामणी लिमये, सीमा कठमाळे, माधुरी कात्रे, चीफ आरबीटर राजेंद्र शिदोरे, उल्हास माळी, जुईली कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: नववी फेरी: व्हाईट व ब्लॅक यानुसार:
मित्रभा गुहा(पश्चिम बंगाल)(8गुण)बरोबरी वि.वेंकटेश एमआर(तामिळनाडू)(8गुण);
सम्मेद शेटे(महा)(8गुण)वि.वि.आकाश दळवी(महा)(7गुण);
ऋत्विज परब(गोवा)(8गुण)वि.वि.सुयोग वाघ(महा)(7गुण);
आयुष शर्मा (मध्यप्रदेश)(7.5गुण)वि.वि.अखि लेश नागरे (महा)(6.5गुण);
ऋतुजा बक्षी(महा)(7गुण)बरोबरी वि.समीर कठमाले(महा)(7गुण);
विक्रमादित्य कुलकर्णी(महा)(7.5गुण)वि.वि. अरविंद अय्यर(महा)(6.5गुण);
अभिषेक केळकर(महा)(7गुण)बरोबरी वि.विकास शर्मा(महा)(7गुण);
साई अग्नि जीवितेश(तेलंगणा)(7.5गुण)वि.वि. दिशा पाटील(महा)(6.5गुण);
पारस भोईर (महा)(7.5गुण)वि.वि.ओजस कुलकर्णी(कर्नाटक)(6.5गुण);
मानस गायकवाड(महा)(6.5 गुण)पराभुत वि.प्रज्वल शेट(कर्नाटक)(7गुण);
सर्वाना कृष्णन पी(तामिळनाडू)(6.5गुण)बरोबरी वि.यश वातारकर(महा)(6.5गुण);
सौरभ म्हामणे(महा)(6गुण)पराभुत वि.गौरव झगडे(महा)(7गुण);
ऋषिकेश कबनुरकर(महा)(6 गुण)पराभुत वि.गौरांग बागवे(महा)(7गुण);
दिव्या पाटील(महा)(7गुण)वि.वि.अरुण कटारिया(राजस्थान)(6गुण);
अंजनेय फाटक(महा)(6गुण)पराभुत वि.नमीत चव्हाण(महा)(7गुण).