---Advertisement---

‘अरे बड्डे आहे भावाचा अन् जल्लोष साऱ्या गावाचा’, अजिंक्य रहाणेला शुभेच्छा देताना दिल्ली कॅपिटल्सचा मराठी तडका

On: रविवार, जून 6, 2021 7:42 PM
---Advertisement---

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेचा आज (६ जून) ३३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्याला क्रिकेट जगतातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याला दिवसभरात अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. पण इंडियन प्रीमीयर लीगमधील दिल्ली कॅपिटल्स संघाने त्याला दिलेल्या अनोख्या शुभेच्छांनी सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

दिल्ली कॅपिटल्सकडून खास शुभेच्छा
मुंबईत लहानाचा मोठा झालेला रहाणे २०२० आयपीएल हंगामापासून दिल्ली कॅपिटल्सचा भाग आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सने रहाणेला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आयपीएल स्पर्धेदरम्यान अजिंक्य रहाणेला विविध क्षणी टिपलेले क्षण दिसतात. अनेकदा शूटच्यावेळी रहाणे नाचताना तर कधी संघसहकाऱ्यांसह मजामस्ती करताना दिसत आहे.

विशेष म्हणजे या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला दिल्ली कॅपिटल्सने ‘अरे बड्डे आहे भावाचा अन् जल्लोष साऱ्या गावाचा’ हे प्रसिद्ध मराठी गाणे वाजवले आहे. हा व्हिडिओ चाहत्यांच्या चांगलाच पंसंतीस उतरत आहे. या व्हिडिओला दिल्लीचे कॅप्शन दिले आहे की ‘अरे अज्जु भाऊंच्या बड्डे ला DJ जोरात लावायचा’.

रहाणेने दिल्लीकडून आत्तापर्यंत आयपीएलमध्ये खेळताना ११ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने १ अर्धशतकासह १२१ धावा केल्या आहेत.

https://www.instagram.com/p/CPxvmRUBJNB/

रहाणे सध्या इंग्लंड दौऱ्यावर
भारतीय कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. त्यामुळे रहाणेदेखील भारतीय संघासह सध्या साऊथॅम्टन येथे आहे. या इंग्लंड दौऱ्यात भारतीय कसोटी संघाला साऊथॅम्पटन येथे न्यूझीलंडविरुद्ध १८ ते २२ जून दरम्यान जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. तसेच ऑगस्ट-सप्टेंबरदरम्यान इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.

रहाणेची कारकिर्द 
रहाणेने आत्तापर्यंत त्याच्या कारकिर्दीत ७३ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने ४१.२८ च्या सरासरीने ४५८३ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या १२ शतकांचा आणि २३ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच रहाणेने ९० वनडे सामने खेळले असून यामध्ये त्याने ३ शतके २४ अर्धशतकांसह ३५.२६ सरासरीने २९६२ धावा केल्या आहेत.

त्याचबरोबर रहाणेने २० आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले असून १ अर्धशतकासह ३७५ धावा केल्या आहेत. याशिवाय रहाणेने आयपीएलमध्ये १५१ सामन्यांत ३१.५२ च्या सरासरीने ३८४१ धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

बांग्लादेशमधील सामन्यात बायो बबलचे उल्लंघन, दिग्गज खेळाडूचे नाव आले समोर

व्वा रं पठ्ठ्या! ‘क्रिकेटची पंढरी’ लॉर्ड्सवर पदार्पण करताना कॉनवेने मोडला ३९ वर्षीय जुना विश्वविक्रम

चाहत्याच्या ‘या’ प्रश्नावर रियान परागने शेअर केला कोहलीची स्वाक्षरी असलेल्या बॅटचा फोटो

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---