आयपीएल २०२१ हगामाचा दुसरा टप्पा सुरू होण्यापूर्वीच दिल्ली कॅपिटल्सला धक्का बसला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा युवा फिरकीपटू सिद्धार्थ मणिमरण स्पर्धेबाहेर झाला आहे. प्रशिक्षणादरम्यान सिद्धार्थ मणिमरणला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो लवकरच भारतात परतू शकतो.
सिद्धार्थ मणिमरणने अद्याप आयपीएलमध्ये पदार्पण केलेले नाही, पण तो दिल्ली कॅपिटल्स संघातील महत्त्वाचा खेळाडू राहिला आहे. सिद्धार्थ हा डावखुरा फिरकीपटू आहे आणि नेट सरावाच्या वेळी तो खूप महत्वाची भूमिका बजावतो. सिद्धार्थ मणिमरणला दिल्ली कॅपिटल्सने २० लाखांच्या मूळ किमतीवर खरेदी केले होते, यापूर्वी हा फिरकीपटू कोलकाता नाईट रायडर्सचाही एक भाग होता. पण कोलकाता नाईट रायडर्स त्याला संधी न देता संघातून मुक्त केले होते.
सिद्धार्थ मणिमरण हा तामिळनाडूचा खेळाडू आहे. या २३ वर्षीय गोलंदाजाने ४ प्रथम श्रणी, २ लिस्ट ए आणि ६ टी-२० सामने खेळले आहे. सिद्धार्थ मणिमरणला टी-२० स्पेशलिस्ट गोलंदाज मानले जाते. या गोलंदाजाने ६ टी-२० सामन्यात १६ विकेट्स घेतल्या आहेत आणि त्याचा इकॉनॉमी रेट फक्त ६.८१ इतका राहिला आहे.
सिद्धार्थ मणिमरणच्या जागी दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या संघात कुलवंत खेजरोलियाला संघात घेतले आहे. जो नेट गोलंदाज म्हणून संघाशी जोडलेला होता.
🚨 SQUAD UPDATE 🚨
Left-arm pacer @KKhejroliya, who was already a part of the DC bio-bubble as a net bowler, joins the roster for the remainder of #IPL2021 as @Siddharth_M03's replacement.
Official Statement 👉🏼 https://t.co/ZSH8HxiZVP#YehHaiNayiDilli pic.twitter.com/0zdh7PLfR5
— Delhi Capitals (@DelhiCapitals) September 15, 2021
आयपीएल २०२१ बद्दल बोलायचे झाल्यास, दिल्ली कॅपिटल्स सध्या गुणतालिकेमध्ये अव्वल क्रमांकावर आहे. दिल्लीने ८ पैकी ६ सामने जिंकले आहेत. त्यामुळे त्यांचा प्लेऑफमधील प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे. आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात दिल्ली कॅपिटल्स २२ सप्टेंबर रोजी सनराजर्स हैदराबादविरुद्ध पहिल्या सामन्याला सामोरे जाईल. या आधीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सनराजर्सनेला पराभूत केले होते. दिल्लीने सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
बटलरच्या जागी आयपीएलमध्ये खेळणारा खेळाडू आहे जबरदस्त फॉर्ममध्ये, राजस्थानसाठी ठरु शकतो ‘एक्स फॅक्टर’
Video: डिव्हिलियर्सची ‘३६० डिग्री’ फटकेबाजी; ४६ चेंडूत शतक करत वाढवलं प्रतिस्पर्ध्यांचं टेंशन
Video: स्मिथच्या घातक चेंडूने मोडली गेलची बॅट, ‘युनिवर्स बॉस’चेही जशास तसे उत्तर