---Advertisement---

विजयाच्या जल्लोषात दुखापतीची चिंता; दिल्ली कॅपिटल्सचा ‘हा’ स्टार क्रिकेटपटू जखमी, दोन सामन्यांना मुकणार?

On: रविवार, एप्रिल 11, 2021 2:58 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या 14 व्या सत्रामध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाने विजयासह प्रारंभ केला आहे. शनिवार (10 एप्रिल) रोजी झालेल्या त्यांच्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने चेन्नई सुपर किंग्जचा 7 गडी राखून पराभव केला. परंतु आता दिल्लीच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. दिल्लीचा अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे.

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघ इशांत शर्माव्यतिरीक्त मैदानात उतरला होता. त्याच्या जागी आवेश खानला संघात संधी देण्यात आली होती. हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले होते. पण सामन्यानंतर इशांत शर्माला दुखापत झाल्याची माहिती समोर आली. कदाचित तो दुखापतीमुळे पुढील २ सामन्यांनाही मुकण्याची शक्यता आहे.

दिल्ली कॅपिटल्स संघाचे सहाय्यक प्रशिक्षक मोहम्मद कैफ यांनी इशांत शर्माच्या तंदुरुस्तीबाबत एक अपडेट दिले आहे. त्यामध्ये ते म्हणाले, “इशांत शर्मा दुखापतग्रस्त असून तो जर तंदुरुस्त झाला असता; तर त्याला सीएसके विरुद्धच्या सामन्यात संधी मिळाली असती. पण इशांतच्या दुखापतीमुळे आम्हाला आवेश खानला मैदानात उतरवावे लागले.”

तसेच पहिल्या सामन्यात दिल्ली संघापुढे खूप अडचणी होत्या. संघाचे मुख्य वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आणि एन्रिच नॉर्किए क्वारंटाईन असल्यामुळे सीएसकेविरुद्धच्या सामन्याला मुकले होते. त्यामुळे या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघ ख्रिस वोक्स आणि टॉम करन या वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरला होता. मात्र या वेगवान गोलंदाजांनी पहिल्या सामन्यात चांगले प्रदर्शन केले. आवेश खान आणि ख्रिस वॉक्स यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले होते.

महत्त्वाच्या बातन्या-

सेम टू सेम! दिल्ली-चेन्नई सामन्यात अश्विनने केदारच्या गोलंदाजीची केली हुबेहुब नक्कल, व्हिडिओ व्हायरल

लाजली बघा! झहीर खान अनुष्का शर्माला म्हणाला असं काही, मिसेस कोहली लाजेने झाली लालबुंद

असं सेलिब्रेशन आयुष्यात पाहिलं नसेल! विकेट घेताच गोलंदाजाने पायातले शूज काढले अन् कानाला लावले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---