शनिवारी (१० एप्रिल) पार पडलेली आयपीएल २०२१ स्पर्धेतील दुसरी लढत युवा रिषभ पंतच्या नेतृत्वात खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघ आणि अनुभवी एमएस धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघांमध्ये पार पडली. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने ७ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यातील पहिल्या डावात दिल्ली कॅपिटल्स संघाचा फिरकी गोलंदाज आर अश्विन याने चेन्नई सुपर किंग्जचा माजी खेळाडू केदार जाधवची हुबेहूब नक्कल केल्याचे पाहायला मिळाले. यावेळचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या सामन्यात दिल्ली संघाने नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्ज संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. या आमंत्रणाचा स्वीकार करत चेन्नई संघाच्या फलंदाजांनी १८८ धावा चोपल्या होत्या. याच डावात आर अश्विनकडून केदार जाधवच्या गोलंदाजी ॲक्शनची हुबेहूब नक्कल केल्याचे दृश्य पाहायला मिळाले. तो अगदी केदारच्या शैलीत धावत येतो आणि एक पाय पुढे घेत आणि दुसरा पाय गुडघ्यात वाकवत चेंडू टाकतो. यावेळी त्याचा हातही अगदी केदारच्या शैलीत वळतो.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच या व्हिडिओवर चाहते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
— Cricsphere (@Cricsphere) April 10, 2021
चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून, मोईन अली आणि सुरेश रैना हे दोघेही तुफान फटकेबाजी करत होते. त्याच वेळेस रिषभ पंतने अश्विनला गोलंदाजीला आणले होते. पहिल्या डावातील सातव्या षटकात अश्विनने हा प्रयोग करून पाहिला. तरी देखील मोईन अली आणि सुरेश रैना यांनी त्याच्या गोलंदाजीवर तुफान फटकेबाजी केली.
यापूर्वी देखील अश्विनने वेस्ट इंडीज संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात सुनील नरेनच्या गोलंदाजीची नक्कल केल्याचे पाहायला मिळाले होते. चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात अश्विनने ४ षटक गोलंदाजी केली. यात त्याने ४७ धावा खर्च करत १ गडी बाद केला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
लाजली बघा! झहीर खान अनुष्का शर्माला म्हणाला असं काही, मिसेस कोहली लाजेने झाली लालबुंद
असं सेलिब्रेशन आयुष्यात पाहिलं नसेल! विकेट घेताच गोलंदाजाने पायातले शूज काढले अन् कानाला लावले
सपशेल फ्लॉप ते सुपरहिट! सीएसकेला चोप चोप चोपणाऱ्या पृथ्वी शॉला कसा गवसला सूर? वाचा