मुंबई येथे सुरू असलेल्या पहिल्या वुमेन्स प्रिमियर लीगमधील दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स असा खेळला गेला. पहिला सामन्याप्रमाणेच काहीशा एकतर्फी झालेल्या या सामन्यात दिल्लीने आरसीबीचा तब्बल 60 धावांनी दणदणीत पराभव करत विजयी सलामी दिली. फलंदाजांनी उभारलेल्या मोठ्या धावसंख्येचा बचाव करताना दिल्लीची वेगवान गोलंदाज तारा नॉरिस हिने पाच बळी मिळवत संघाच्या विजयात मोठे योगदान दिले.
🚨 First associate player to register a 4⃣-wicket haul in the #TATAWPL ✅
Well done to USA's Tara Norris 👏👏 #RCBvDC
Follow the match ▶️ https://t.co/593BI7xKRy#TATAWPL | #RCBvDC https://t.co/QDdkTojR1r
— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 5, 2023
ब्रेबॉर्न स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात सुरुवातीला दिल्लीच्या फलंदाजांनी वर्चस्व गाजवले. दिल्ली संघाची कर्णधार मेग लॅनिंग व शफाली वर्मा यांनी दिल्लीसाठी सलामीला येताना आरसीबीच्या गोलंदाजांवर आक्रमण केले. दोघींनी पहिल्या विकेटसाठी तब्बल 162 धावा जोडल्या. लॅनिंगने 43 चेंडूवर 14 चौकार लगावत 72 धावा चोपल्या. तर, दुसऱ्या बाजूने शफालीने आपल्या नावाला साजेसा खेळ दाखवला. तिने अवघ्या 45 चेंडूवर 84 धावा तडकावल्या. या खेळीत 10 चौकार व 4 गगनचुंबी षटकारांचा समावेश होता. त्यानंतर आलेल्या मरिझान कापने 17 चेंडूवर 3 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 39 तर जेमिमा रॉड्रिग्जने 22 धावांचे योगदान दिले.
फलंदाजांनी उभारलेल्या 223 धावा वाचवताना दिल्लीसाठी तारा नॉरिस हिने जबाबदारी सांभाळली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अमेरिकेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नॉरिसने आरसीबीच्या दिग्गजांना जखडून ठेवले. तिने आपल्या चार षटकांमध्ये केवळ 29 धावा देत 5 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. तसेच WPL मध्ये पाच बळी मिळवणारी ती पहिली गोलंदाज ठरली. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात मुंबईच्या साकीया इसाकने चार बळी मिळवले होते.
सध्या 24 वर्षांची असलेली तारा अमेरिकेची सर्वोत्तम क्रिकेटपटू मानली जाते. तिला जगभरातील टी20 लीग खेळण्याचा अनुभव आहे. याच कारणाने दिल्लीने तिच्यावर मोठी बोली लावली होती.
(Delhi Capitals Tara Norris Become First Bowler Who Took Fifer In WPL History)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बुमराहशी घेतलेला पंगा इंग्लंडला चांगलाच महागात पडला, लागोपाठ बाऊंसरचा मारा करत उडवलेली अँडरसनचीही झोप
चौदाव्या पीवायसी-एटीसी स्नुकर अजिंक्यपद 2023 स्पर्धेत कॉर्नर पॉकेट वॉरियर्स, कॉर्नर पॉकेट शुटर्स, द बॉईज संघांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश