आयपीएल 2024 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात सामना सुरु आहे. तर इशांत शर्माने पहिली दोन षटके शानदार गोलंदाजी केली आणि कर्णधार शिखर धवनला क्लीन बोल्ड केले. पण सहाव्या षटकात क्षेत्ररक्षण करताना तो जखमी झाला असून त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सच्या अडचणी वाढल्या आहेत.
याबरोबरच २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत हार्दिक पांड्या आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिका मालिकेत सूर्यकुमार यादवलाही अशाच प्रकारे दुखापत झाली होती. त्यानंतर हार्दिक पुनरागमन करणार आहे,पण सूर्या अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. अशा स्थितीत इशांतची ही दुखापत मोठी ठरू शकते आणि तो अनेक सामन्यांतून किंवा संपूर्ण स्पर्धेतूनही बाहेर होऊ शकतो.
याआधी या सामन्यात ऋषभ पंतचे पुनरागमन झाले पण पृथ्वी शॉला या सामन्यातून प्रथम बाहेर ठेवून पंतने सर्वांना चकित केले. त्यानंतर मुकेश कुमारही बॉलिंग लाइनअपमध्ये दिसला नाही. याशिवाय इशांत शर्मा 2 षटके टाकल्यानंतरच जखमी झाला आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सच्या अडचणीत वाढ झाली आहे.
2 Quick Wickets in the Powerplay by Ishant Sharma.
But he gets injured.#TATAIPL | #PBKSvDC | #IPL2024 | #TATAIPL2024#RishabhPant #DCvsPBKS #PunjabKings pic.twitter.com/hRD7U3009u
— IPL Scoop (@Ipl_scoop) March 23, 2024
दरम्यान, अशा परिस्थितीत आता वेगवान बॅटरी मिचेल मार्श आणि खलील अहमद यांच्यावर अवलंबून आहे. याआधी इशांतने चांगली गोलंदाजी केली होती. तर त्याने धवनच्या रूपाने 2 षटकात 16 धावा देत मोठी विकेट घेतली. त्यानंतर बेअरस्टोच्या धावबादला हातभार लावला होता. आता मात्र त्याच्या पुनरागमनाची किंवा दुखापतीची अपडेट कधी मिळते याची चिंता दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला लागून राहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
- कोलकाता आणि हैदराबाद आमने-सामने, कोण ठरणार वरचढ? घ्या जाणून हेड टू हेड आकडेवारी
- हंगामातील पहिला सामना जिंकण्यासाठी पंजाबपुढे 175 धावांचे आव्हान, ‘इतक्या’ धावांची खेळी करत पंतचे कमबॅक