आयपीएलचा 17 वा हंगाम सुरू झाला असून लगेच आज शनिवारी ‘डबल हेडर’मध्ये कोलकता आणि हैदराबाद यांच्यात सामना होत आहे. तसेच दोन्ही संघांचा हा या सिजनमधील पहिलाच सामना आहे. पण एकीकडे कोलकताचा कर्णधार श्रेयस अय्यर तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचे प्रमुख वेगवान गोलंदाज आणि सर्वाधिक रक्कम मिळालेले मिचेल स्टार्क आणि पॅट कमिंस एकमेकांविरुद्ध कशी कामगिरी करतात याचीही उत्सुकता लागून राहिली आहे.
याबरोबरच रिषभ पंतप्रमाणे श्रेयस अय्यरही गतवर्षी पूर्ण आयपीएल स्पर्धेस मुकला होता. पण यावर्षी संघात परतल्यावर त्याच्याकडे पुन्हा नेतृत्वाची धुरा देण्यात आली आहे. तर जी विजेता कर्णधार गौतम गंभीर आता संघात मेंटॉर म्हणून परतला आहे. त्याचबरोबर या सामन्यात पॅट कमिन्सआणि मिचेल स्टार्क या दोन आयपीएलमधील सर्वात महागड्या खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वांचे विशेष लक्ष असणार आहे.
अशातच दोन्ही संघांतील सामना ईडन गार्डन्सवर होणार असून हा सामना उच्च-स्कोअरिंग होऊ शकतो. ईडन गार्डन्सवर कर्णधार नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. कारण यापूर्वीही अनेकदा असे घडले आहे. यावेळीही परिस्थिती काही वेगळी नसेल. या सामन्यात खूप धावा केल्या जाऊ शकतात, पण गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले, तर सुरुवातीपासूनच फिरकी गोलंदाजीचा दबदबा दिसून आला आहे.
दरम्यान, आयपीएलच्या इतिहासात, केकेआर आणि एसआरएच आजपर्यंत २५ वेळा आमनेसामने आले आहेत, त्यापैकी कोलकाता नाईट रायडर्सने १६ सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर सनरायझर्स हैदराबादने ९ सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच केकेआरकडे रहमानउल्ला गुरबाज, श्रेयस अय्यर, नितीश राणा आणि रिंकू सिंग आहेत, पण त्यांचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. दुसरीकडे, एसआरएचकडे ट्रॅव्हिस हेड, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन यांच्या रूपाने जागतिक दर्जाचे फलंदाज आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
- हंगामातील पहिला सामना जिंकण्यासाठी पंजाबपुढे 175 धावांचे आव्हान, ‘इतक्या’ धावांची खेळी करत पंतचे कमबॅक
- 454 दिवसांनंतर मैदानात परतल्यावर ऋषभ पंत भावूक! म्हणाला, लहान लहान…