दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात बुधवारी (११ मे) मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर आयपीएल २०२२चा ५८वा सामना झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आर अश्विन आणि देवदत्त पडीक्कलने झुंजार खेळी केली. परंतु प्रत्युत्तरात दिल्लीचे मिचेल मार्श आणि डेविड वॉर्नर राजस्थानवर भारी पडले आणि दिल्लीने ८ विकेट्सने राजस्थानवर विजय मिळवला. हा दिल्लीचा हंगामातील सहावा विजय होता. या विजयासह दिल्लीने त्यांच्या प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने निर्धारित २० षटकात ६ विकेट्सच्या नुकसानावर १६० धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल दिल्ली संघाने १८.१ षटकातच राजस्थानचे आव्हान पूर्ण केले. यादरम्यान त्यांनी २ विकेट्सही गमावल्या.
A brilliant chase from @DelhiCapitals as they win by 8 wickets and add two crucial points to their tally.
Scorecard – https://t.co/EA3RTz0tWQ #RRvDC #TATAIPL pic.twitter.com/G7xUp2HNwJ
— IndianPremierLeague (@IPL) May 11, 2022
मार्श आणि वॉर्नर ठरले दिल्लीचे तारणहार
राजस्थानच्या १६१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीकडून मिचेल मार्शने धडाकेबाज खेळी केली. ६२ चेंडू खेळताना त्याने सर्वाधिक ८९ धावा फटकावल्या. यादरम्यान त्याने ७ षटकार आणि ५ चौकारही मारले. सलामीवीर श्रीकर भरतची शून्य धावेवर विकेट गमावल्यानंतर मार्शची ही खेळी संघासाठी महत्त्वपूर्ण ठरली. मार्शव्यतिरिक्त सलामवीर डेविड वॉर्नरनेही संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्याने १ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ५१ धावा फटकावल्या. तसेच कर्णधार रिषभ पंतने शेवटी फलंदाजीला येत ४ चेंडूत नाबाद १३ धावा करत संघाला विजयी शेवट करून दिला.
या डावात राजस्थानचे गोलंदाज मात्र सपशेल फेल ठरले. राजस्थानकडून केवळ ट्रेंट बोल्ट आणि युझवेंद्र चहल यांना १-१ विकेट घेता आली.
अश्विनचे अर्धशतक व्यर्थ
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना राजस्थानकडून सलामीवीर जोस बटलर या सामन्यात मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला. यशस्वी जयस्वालही १९ धावांवर बाद झाला. परंतु पुढे आर अश्विन आणि देवदत्त पडीक्कलने राजस्थानचा डाव सावरला. अश्विनने ५० धावांचे योगदान दिले. तर पडीक्कल ३० चेंडूत ४८ धावा करून बाद झाला. त्यांच्या या खेळींच्या जोरावर राजस्थानने निर्धारित २० षटकात ६ विकेट्सच्या नुकसानावर १६० धावा केल्या.
या डावात दिल्लीच्या गोलंदाजांनीही चांगले प्रदर्शन केले. चेतन सकारियाने संघाला २ महत्त्वपूर्ण विकेट्स मिळवून दिल्या. तसेच एन्रिच नॉर्किया आणि मिचेल मार्श यांनीही प्रत्येकी २ फलंदाजांच्या विकेट्स घेतल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
दिल्लीला धक्का? पृथ्वी शॉच्या पुनरागमनाबद्दल धक्कादायक अपडेट, वाचा काय म्हणाले कोच पाँटिंग
अश्विनची फलंदाजी ऍक्शन पाहून व्हाल लोटपोट, याआधी कधीही पाहिला नसेल असा बॅटिंग स्टान्स