Sunday, May 22, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दिल्लीला धक्का? पृथ्वी शॉच्या पुनरागमनाबद्दल धक्कादायक अपडेट, वाचा काय म्हणाले कोच पाँटिंग

दिल्लीला धक्का? पृथ्वी शॉच्या पुनरागमनाबद्दल धक्कादायक अपडेट, वाचा काय म्हणाले कोच पाँटिंग

May 11, 2022
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
Prithvi-Shaw

Photo Courtesy: Twitter/IPL


दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात बुधवारी (११ मे) मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर रंगतदार लढत झाली. उभय संघांनी हा सामना जिंकण्यासाठी पूर्ण जोर लावला. या सामन्यात दिल्लीकडून त्यांचा धाकड सलामीवीर पृथ्वी शॉ खेळताना दिसला नाही. त्याला ताप आल्यामुळे तो सलग तिसऱ्या सामन्याला मुकला आहे. या सामन्यादरम्यान दिल्ली संघाचे प्रशिक्षक रिकी पाँटिग यांनी पृथ्वी शॉच्या तब्येतीबाबत धक्कादायक असे अपडेट दिले आहे.

चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यापूर्वी पृथ्वी शॉला ताप आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. स्वत पृथ्वी शॉने रुग्णालयातील आपला फोटो शेअर करत यासंदर्भात माहिती दिली होती. परंतु दिल्ली संघाला तो लवकरच यातून बरा होईल आणि संघात पुनरागमन करेल अशी अपेक्षा होती. मात्र अद्याप त्याचा ताप कमी नसल्याचे समजत आहे.

परिणामी पृथ्वी शॉ दिल्लीचे आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील उर्वरित सामन्यांनाही मुकण्याची दाट शक्यता आहे. स्वत पाँटिंगने याबाबत महत्त्वूपर्ण अपडेट दिले आहे. राजस्थानविरुद्धच्या सामन्यादरम्यान प्रशिक्षक पाँटिगला पृथ्वी शॉच्या तब्येतीबाबत प्रश्न विचारण्यात आला. याबाबत बोलताना पाँटिगने पुष्टी केली की, पृथ्वी शॉने उर्वरित हंगामातून माघार घेतली आहे.

असे असले तरीही, अद्याप दिल्ली संघाकडून याबाबत अधिकृत माहिती पुढे आलेली नाही.

पृथ्वी शॉची या हंगामातील कामगिरी
पृथ्वी शॉला या हंगामात मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मात्र, त्याने संघाला पॉवरप्लेमध्ये चांगली सुरुवात करून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्याने अवघ्या ९ सामन्यात २८.७८च्या सरासरीने आणि १५९.८८च्या स्ट्राईक रेटने २५९ धावा चोपल्या आहेत. यामध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही ६१ राहिली आहे. त्याच्या नावावर या हंगामात २ अर्धशतकांचा समावेश आहे.

पृथ्वी शॉची आयपीएल कारकीर्द
आयपीएल २०१८पासून खेळणाऱ्या पृथ्वी शॉने आतापर्यंत एकूण ६२ सामने खेळले आहेत. त्यात त्याने २५.२३च्या सरासरीने एकूण १५६४ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने १२ अर्धशतके चोपली आहेत. यामध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही ९९ इतकी राहिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

अश्विनची फलंदाजी ऍक्शन पाहून व्हाल लोटपोट, याआधी कधीही पाहिला नसेल असा बॅटिंग स्टान्स

अश्विन अण्णांनी दिल्लीला झोडले! १३१च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत पहिल्यांदाच ‘ही’ विक्रमी कामगिरी केली

बिग ब्रेकिंग! सीएसकेचा स्टार अष्टपैलू रविंद्र जडेजा उर्वरित आयपीएल हंगामातून बाहेर


ADVERTISEMENT
Next Post
Mitchell-Marsh-David-Warner

दिल्लीचा राजस्थानवर 'रॉयल' विजय, मार्श आणि वॉर्नरने जिंकून दिली मॅच; प्लेऑफच्या आशाही जिवंत

Ashish-Nehra

लॅपटॉप नाही, कागद-पेनाने बनवली रणनीती; कोच नेहराने नवख्या गुजरातला असे बनवले 'चँपियन'

रियान पराग निघाला राजस्थानचा 'डॉन', दिल्लीच्या घातक गोलंदाजाच्या भेदक चेंडूवर मारला ९६ मीटरचा षटकार

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.