Thursday, May 19, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बिग ब्रेकिंग! सीएसकेचा स्टार अष्टपैलू रविंद्र जडेजा उर्वरित आयपीएल हंगामातून बाहेर

बिग ब्रेकिंग! सीएसकेचा स्टार अष्टपैलू रविंद्र जडेजा उर्वरित आयपीएल हंगामातून बाहेर

May 11, 2022
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
Ravindra-Jadeja

Photo Courtesy: Twitter/ChennaiIPL


इंडियन प्रीमियर लीगमधून मोठी बातमी पुढे येत आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजा आयपीएल २०२२च्या उर्वरित हंगामातून बाहेर झाला आहे. दुखापतीमुळे त्याला आयपीएलला मुकावे लागणार आहे. खुद्द चेन्नई संघाचे सोशल मीडियाद्वारे याची माहिती दिली आहे. 

चेन्नई संघाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “जडेजाला बरगडीची दुखापत झाली आहे. याच कारणास्तव रविवारी (०९ मे) दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध चेन्नईच्या सामन्यासाठी तो उपलब्ध नव्हता. जडेजाला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध ४ मे रोजी सामना खेळताना क्षेत्ररक्षणावेळी ही दुखापत (A Rib Injury) झाली होती. तो डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली होता आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार त्याला आयपीएलच्या उर्वरित हंगामातून वगळण्यात आले आहे.”

📢 Official Announcement:

Jadeja will be missing the rest of the IPL due to injury. Wishing our Jaadugar a speedy recovery! @imjadeja

— Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 11, 2022

दरम्यान, जडेजा चेन्नई सुपर किंग्सचा आयपीएल २०२२ च्या सुरुवातील कर्णधार झाला होता. आयपीएल २०२२ हंगामापूर्वी (IPL 2022) धोनीने (MS Dhoni) चेन्नईच्या नेतृत्वाची धुरा जडेजाकडे (Ravindra Jadeja) सोपवली होती. पण जडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नईला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. तसेच जडेजाची वैयक्तिक कामगिरीही खालावली. त्यामुळे जडेजाने पहिल्या ८ सामन्यात नेतृत्व केल्यानंतर वैयक्तिक कामगिरीकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे धोनी पुन्हा कर्णधार झाला.

जडेजाची निराशाजनक कामगिरी
जडेजासाठी आयपीएल २०२२ हंगाम विसण्यासारखा राहिला. कारण चेन्नई संघ त्याच्या नेतृत्वाखाली ८ पैकी केवळ २ सामने जिंकू शकले. तसेच त्याची वैयक्तिक कामगिरीही फारशी बरी झाली नाही. त्याने आयपीएल २०२२ मध्ये १० सामने खेळले असून ११६ धावा केल्या आहेत. तसेच ५ विकेट्स घेतल्या आहेत.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या – 

‘काहीतरी मोठे होणार आहे’, रोहित शर्माबद्दल भारताच्या दिग्गज अष्टपैलूची खास भविष्यवाणी 

आयपीएल २०२२ ला लागणार समारोप समारंभाचा तडका, ‘या’ सेलिब्रेटिंचा परफॉर्मन्स होण्याची शक्यता

धक्कादायक! मुंबईतील धावपटू जवळपास महिन्याभरापासून बेपत्ता, ‘हे’ गंभीर कारण असण्याची शक्यता


ADVERTISEMENT
Next Post
R-Ashwin-Batting

अश्विन अण्णांनी दिल्लीला झोडले! १३१च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत पहिल्यांदाच 'ही' विक्रमी कामगिरी केली

R-Ashwin-Batting

अश्विनची फलंदाजी ऍक्शन पाहून व्हाल लोटपोट, याआधी कधीही पाहिला नसेल असा बॅटिंग स्टान्स

Prithvi-Shaw

दिल्लीला धक्का? पृथ्वी शॉच्या पुनरागमनाबद्दल धक्कादायक अपडेट, वाचा काय म्हणाले कोच पाँटिंग

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.