Monday, May 23, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वॉर्नर आणि पॉवेलने चोपले, खलील अहमदने रोखले; दिल्लीचा हैदराबादवर २१ धावांनी विजय

वॉर्नर आणि पॉवेलने चोपले, खलील अहमदने रोखले; दिल्लीचा हैदराबादवर २१ धावांनी विजय

May 5, 2022
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
Delhi-Capitals

Photo Courtesy: iplt20.com


गुरुवारी (०५ मे) आयपीएल २०२२चा ५०वा सामना झाला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघ आमने सामने होते. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्याच्या दृष्टीने उभय संघांसाठी हा सामना महत्त्वाचा होता. दोन्हीही संघांनी हा सामना जिंकण्यासाठी जोर लावला. परंतु अखेर दिल्लीने बाजी मारत २१ धावांनी हा सामना खिशात घातला. 

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने निर्धारित २० षटकात ३ विकेट्सच्या नुकसानावर २०७ धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादचा संघ ८ विकेट्सच्या नुकसानावर १८६ धावाच करू शकला. हैदराबादचा हा हंगामातील पाचवा पराभव होता, तर दिल्लीचा हा पाचवा विजय होता. 

दिल्लीच्या भल्यामोठ्या २०८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबाद संघाकडून निकोलस पूरनने चिवट झुंज दिली. त्याने ३४ चेंडू खेळताना ६२ धावा फटकावल्या. आपल्या या झंझावाती खेळीदरम्यान त्याने ६ षटकार आणि २ चौकारही मारले. तसेच ऍडेन मार्करमनेही २५ चेंडूत ४२ धावांची शानदार खेळी केली. परंतु त्यांना इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सन तर सर्वात कमी ४ धावा करून बाद झाला.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

दिल्लीकडून खलील अहमदने भेदक गोलंदाजी केली. त्याने ४ षटके फेकताना ३० धावा देत ३ महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. तसेच शार्दुल ठाकूरनेही २ विकेट्सचे योगदान दिले. ऍन्रिच नॉर्किया, मिचेल मार्श आणि कुलदीप यादव यांनीही प्रत्येकी १ विकेट घेतली.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना दिल्लीकडून डेविड वॉर्नरने सर्वाधिक धावा केल्या. सलामीला फलंदाजीला येत त्याने ५८ चेंडूंमध्ये ३ षटकार आणि १२ चौकारांच्या मदतीने नाबाद ९२ धावा फटकावल्या. हे त्याचे आयपीएलमधील ५४ वे तर टी२० क्रिकेटमधील ८९ वे अर्धशतक होते. त्याच्याबरोबरच रोवमन पॉवेलने ३५ चेंडूंमध्ये ६ षटकार आणि ३ चौकारांसह नाबाद ६७ धावा केल्या. दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारीही झाली.

या डावाच्या सुरुवातीला शानदार गोलंदाजी करणारे हैदराबादचे गोलंदाज पुढे चमक दाखवू शकले नाहीत. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार, सीन ऍबॉट आणि श्रेयस गोपाल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

वॉर्नरने हैदराबादला धू धू धुतला, नाबाद ९२ धावांसह गेलला मागे सोडत वर्ल्ड रेकॉर्ड केला

जिंकलस केन! हैदराबादविरुद्ध नाबाद ९२ धावा चोपणाऱ्या वॉर्नरची विलियम्सनने थोपटली पाठ, पाहा Photo

नवी स्पीडगन! उमरानने मोडला स्वत:चाच विक्रम, फेकला आयपीएल इतिहासातील दुसरा सर्वात वेगवान चेंडू


ADVERTISEMENT
Next Post
David-Warner-Rowman-Powell

बड्या दिलाचा वॉर्नर! स्वत:च्या शतकाची नाही केली पर्वा, संधी असूनही पॉवेलला म्हणाला, तोडूनफोडून टाक!

David-Warner

Video: भुवनेश्वरने ऐनवेळी बदलली भूमिका, मग वॉर्नरनेही अफलातून शॉटने दाखवला आपला क्लास

David-Warner

'मी म्हतारा होतोय', सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर असं का म्हणाला वॉर्नर, वाचा सविस्तर

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.