Thursday, May 19, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिंकलस केन! हैदराबादविरुद्ध नाबाद ९२ धावा चोपणाऱ्या वॉर्नरची विलियम्सनने थोपटली पाठ, पाहा Photo

जिंकलस केन! हैदराबादविरुद्ध नाबाद ९२ धावा चोपणाऱ्या वॉर्नरची विलियम्सनने थोपटली पाठ, पाहा Photo

May 5, 2022
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
Kane-Appreciating-Warner

Photo Courtesy: Twitter


सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात गुरुवारी (०५ मे) आयपीएल २०२२चा ५०वा सामना रंगला. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेला हा सामना दिल्लीचा सलामीवीर डेविड वॉर्नर याच्यासाठी अतिशय खास होता. तो ८ वर्षांत पहिल्यांदाच आपली जुनी फ्रँचायझी हैदराबादविरुद्ध मैदानावर उतरला होता. या सामन्यात त्याने धुव्वादार खेळीही केली. मात्र हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सन याने वॉर्नरप्रती खिलाडूवृत्ती दाखवत सर्वांचे लक्ष वेधले.

वॉर्नरने या सामन्यात सलामीला फलंदाजीला येत नाबाद ९२ धावांची प्रशंसनीय खेळी केली. ५८ चेंडू खेळताना ३ षटकार आणि १२ चौकारांच्या मदतीने त्याने या धावा केल्या. याखेरीज त्याने रोवमन पॉवेलसोबत मिळून शतकी भागीदारीही रचली आणि संघाला २०७ धावांपर्यंत पोहोचवले.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

दुर्देवाने तो आपले शतक पूर्ण करू शकला नाही. मात्र त्याच्या नाबाद ९२ धावांच्या खेळीचे संघसहकाऱ्यांकडून कौतुक झाले. याखेरीज हैदराबाद संघात वॉर्नरची जागा घेणाऱ्या विलियम्सननेही (Kane Williamson) त्याच्या खेळीचे कौतुक केले. त्याने दिल्लीच्या डावानंतर वॉर्नरची पाठ थोपटत (Williamson Appreciating Warner)त्याचे अभिनंदन केले. तसेच त्याचा माजी संघ सहकारी आणि वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार यानेही त्याचे कौतुक केले. हैदराबाद संघाच्या या खेळाडूंच्या खिलाडूवृत्तीचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. 

Great gesture from Kane Williamson and Bhuvneshwar Kumar, appreciating their former teammate David Warner's brilliant knock. pic.twitter.com/Qy3rqEEuM8

— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 5, 2022

Appreciated Ruturaj on last match who was out on 99 & Warner tonight 92* who just missed a well deserved 100. Brilliant gesture by captain Kane Williamson,the most loved player for a reason🧡#IPL2022 #SRHvsDC #SRHvDC pic.twitter.com/AwHsyJFBkL

— Ayesha (@JoeRoot66Fan) May 5, 2022

Great gesture from Kane Williamson and Bhuvneshwar Kumar, appreciating their former teammate David Warner's brilliant knock. pic.twitter.com/RdXwbPzPzY

— 🔔#𝐒𝐯𝐩KCPD𝐎𝐧𝐌𝐚𝐲𝟏𝟐𝐭𝐡 (@TheDileep7) May 5, 2022

दरम्यान वॉर्नरने (David Warner) या सामन्यात हैदराबादच्या (Sunrisers Hyderabad) गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याच्या या खेळीदरम्यान त्याच्या बॅटमधून ३ षटकारही निघाले. या षटकारांसह त्याने टी२० क्रिकेटमधील आपल्या ४०० षटकारांचा आकडा पूर्ण केला आहे. तो टी२० क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून ४०० किंवा त्यापेक्षा जास्त षटकार ठोकणारा (David Warner 400 Sixes) तिसराच फलंदाज ठरला आहे.

वॉर्नरने उमरान मलिक, ऍडन मार्करम आणि कार्तिक त्यागी या हैदराबादच्या ३ वेगवेगळ्या गोलंदाजांविरुद्ध षटकार ठोकत आपल्या टी२०तील ४०० षटकारांचा आकडा गाठला आहे. वॉर्नरपूर्वी ऑस्ट्रेलियाकडून ऍरॉन फिंच आणि शेन वॉटसन यांनी हा पराक्रम केला होता. वॉटसनच्या नावे टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक ४६७ षटकार आहेत. तर फिंचने ४२६ षटकार मारले आहेत.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

नवी स्पीडगन! उमरान मलिकने मोडला स्वत:चाच विक्रम, फेकला आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू

उमरान मलिकचं यश पाहून पाकिस्तानी क्रिकेटर म्हणाला, ‘कोणीही उठतं, शूज घेऊन फास्ट बॉलर बनायला जातं’

वॉर्नरने घेतला ‘अपमानाचा बदला’! सनरायझर्सच्या गोलंदाजांची धुलाई करत पूर्ण केले ४०० सिक्स


ADVERTISEMENT
Next Post
David-Warner-Fifty

वॉर्नरने हैदराबादला धू धू धुतला, नाबाद ९२ धावांसह गेलला मागे सोडत वर्ल्ड रेकॉर्ड केला

Delhi-Capitals

वॉर्नर आणि पॉवेलने चोपले, खलील अहमदने रोखले; दिल्लीचा हैदराबादवर २१ धावांनी विजय

David-Warner-Rowman-Powell

बड्या दिलाचा वॉर्नर! स्वत:च्या शतकाची नाही केली पर्वा, संधी असूनही पॉवेलला म्हणाला, तोडूनफोडून टाक!

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.