---Advertisement---

पॅरिस ऑलिम्पिकच्या पहिल्याच फेरीत पराभव, टेनिस स्टार रोहन बोपण्णाची निवृत्तीची घोषणा

Rohan Bopanna
---Advertisement---

Tennis Star Rohan Bopanna : भारताचा अनुभवी टेनिसपटू रोहन बोपण्णा याने आंतरराष्ट्रीय टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिल्याच फेरीत पराभूत व्हावे लागल्यानंतर त्याने थांबण्याचा निर्णय घेतला. तब्बल 22 वर्षे भारतीय संघाकडून खेळल्यानंतर त्याने आता भारतीय संघाकडून न खेळण्याचा निर्णय घेतला. असे असले तरी तो अद्याप व्यावसायिक टेनिस खेळताना दिसेल.

पॅरिस ऑलिंपिक्स स्पर्धेत रोहन श्रीराम बालाजी याच्यासह पुरुष दुहेरीत भारताचे आव्हान सादर करत होता. मात्र, पहिल्याच फेरी त्यांचा सामना यजमान असलेल्या फ्रान्सच्या गेल मॉंफिल्स व एडवर्ड रॉजर यांच्याशी झाला. त्यांनी भारतीय जोडीचा 7-5, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. त्यामुळे निराश झालेल्या रोहनने निवृत्ती जाहीर करून टाकली. आगामी एशियन गेम्स स्पर्धेत तो भारतासाठी खेळताना दिसणार नाही.

त्याने आपली निवृत्ती जाहीर करताना म्हटले, “ही नक्कीच भारतासाठी माझी शेवटची स्पर्धा होती. मला माहित आहे मी सध्या कुठे आहे. अजून जोपर्यंत शरीर साथ देईल तोपर्यंत मी खेळत राहील.”

रोहन हा रिओ ऑलिंपिक्स दरम्यान पदक जिंकण्याच्या अगदी जवळ आला होता. मिश्र दुहेरीत रोहन व सानिया मिर्झा यांची जोडी चौथ्या स्थानी राहिलेली. त्याने आपल्या निवृत्तीवेळी आपल्या कुटुंबाचे देखील आभार मानले, “माझी पत्नी सुप्रिया हिने माझ्यासाठी अनेक गोष्टींचा त्याग केला आहे.” भविष्यात संधी मिळाल्यास भारतीय टेनिस प्रशासनामध्ये जाण्याचा मनोदय देखील त्याने बोलून दाखवला.

रोहन याने आपल्या निवृत्तीच्या मनोदयात बोलताना त्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर साथीदार राहिलेल्या लिएंडर पेस, महेश भूपती व सोमदेव देवबर्मन यांची देखील आठवण काढली. तसेच 2010 डेविस कप स्पर्धा आपल्या नेहमी स्मरणात राहील असे तो म्हणाला. रोहन हा सध्या 42 वर्षांचा असला तरी, आंतरराष्ट्रीय दुहेरी क्रमवारीत तो दुसऱ्या स्थानी आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

पॅरिस ऑलिम्पिक 2024 : बॅडमिंटनमध्ये सात्विक-चिरागच्या जोडीचा शानदार विजय…!

आशिया चषकातील दमदार प्रदर्शनाचं बक्षीस, स्मृती मंधानाची आयसीसी टी20 क्रमवारीत भरारी
सूर्या शॉर्ट टर्म ऑप्शन…! टी20 मालिका जिंकूनही दिग्गजाने सूर्यकुमारच्या नेतृत्त्वावर उपस्थित केले प्रश्न

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---