---Advertisement---

DC vs LSG दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकला, लखनऊला दिले फलंदाजीचे आमंत्रण

On: सोमवार, मार्च 24, 2025 7:20 PM
---Advertisement---

आज आयपीएल 2025 स्पर्धेतील चौथा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स संघामध्ये खेळला जात आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि लखनऊला फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले आहे. हा सामना विशाखापट्टनममधील वाय.एस राजाशेखर स्टेडियमवर खेळला जात आहे. दोन्ही संघांचे नेतृत्व यावेळी नवीन कर्णधार करत आहेत. एका बाजूला लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार ऋषभ पंत आहे, तसेच दुसरीकडे अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघ आज खेळताना दिसेल.

लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघामध्ये आत्तापर्यंत 5 सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये 3 वेळा लखनऊ तर 2 वेळा दिल्लीने बाजी मारली आहे.
विशाखापट्टनम मधील वाय.एस राजाशेखर स्टेडियम बद्दल बोलायचे झाल्यास, येथे आतापर्यंत 15 आयपीएल सामने खेळण्यात आले आहेत.

ही गोष्ट आश्चर्यचकित करणारी आहे की, विशाखापट्टनम मध्ये यशस्वीपणे केलेली सर्वात मोठी धावसंख्या फक्त 142 धावा आहे. त्यामुळे जर आज प्रथम फलंदाजी करणारा संघ जर मोठी धावसंख्या उभी करू शकला, तर विरोधी संघाला धावांचा पाठलाग करणे खूप अवघड जाऊ शकते.

दिल्ली कॅपिटल्स संघाची प्लेइंग इलेव्हन : जेक फ्रेजर-मैकगर्क, फाफ डु प्लेसिस, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल (कर्णधार), समीर रिजवी, मोहित शर्मा , विप्रज निगम, मिशेल स्टार्क, कुलदीप यादव, मुकेश कुमार

लखनऊ सुपर जायंट्स संघाची प्लेइंग इलेव्हन: , मिचेल मार्श, एडन मारक्रम ऋषभ पंत (कर्णधार), निकोलस पूरन, डेविड मिलर, आयुष बडोनी शाहबाज अहमद, शार्दुल ठाकुर, रवि बिश्नोई, दिग्वेश राठी , प्रिन्स यादव,

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---