---Advertisement---

आयपीएलच्या ‘या’ सामन्यादरम्यान खोटी ओळख दाखवत मैदानात खुसण्याच्या प्रयत्नात असलेल्या २ सट्टेबाजांना अटक

On: बुधवार, मे 5, 2021 5:37 PM
---Advertisement---

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर 2 मे रोजी झालेल्या सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यादरम्यान एक अनुचित प्रकार होता होता वाचला. सामन्यादरम्यान 2 सट्टेबाज आपली खोटी ओळख दाखवत मैदानात घुसण्याचा प्रयत्न करत होते. मात्र दिल्ली पोलिसांनी प्रसंगावधान राखत त्यांना आपल्या ताब्यात घेतले असून त्यांच्यावर कोरोनाच्या बायोबबलचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली जाणार आहे.

एएनआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून दिलेल्या माहितीनुसार, “2 सट्टेबाजांना नकली ओळख दाखवून सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्समधील सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये जाण्याचा प्रयत्न करणे व बायोबबलचा उल्लंघन केल्यामुळे ताब्यात घेतले आहे. आयपीसी आणि एपिडेमिक डिजीस ऍक्टनुसार एफआयआर नोंदवली गेली आहे.”

दरम्यान आयपीएल 2021 चा विचार केला असता कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अखेर हा हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. बायोबबलमध्ये देखील कोरोनाचा शिरकाव झाल्याने अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे वेगवेगळ्या स्तरांतून खेळाडूंच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात होती. अखेर बीसीसीआयने खेळाडूंच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आपण आयपीएलचा 14 वा हंगाम स्थगित करत असल्याचे जाहीर केले.

विशेष म्हणजे आयपीएलच्या सुरुवातीपासूनच स्पर्धेच्या भारतातील आयोजनाबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात होते. अनेक क्रिकेट पंडितांनी अंदाज वर्तवला होता की कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतात आयपीएल पार पाडणे अतिशय अवघड असणार आहे. पण बीसीसीआयने मात्र भारतात आयपीएल स्पर्धा खेळवण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यांचा हा निर्णय अयशस्वी ठरल्याचे सिद्ध झाले आहे. आगामी काळात हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे की बीसीसीआय आयपीएलच्या आयोजनाबाबत काय निर्णय घेते.

महत्त्वाच्या बातम्या –

बाय बाय इंडिया! आयपीएलच्या स्थगितीनंतर इग्लंडचे ‘हे’ ८ खेळाडू परतले मायदेशी

वी विल बी बॅक! आयपीएल १४ स्थगित झाल्याने ‘या’ संघांना सर्वाधिक फायदा, करणार जोरदार पुनरागमन?

कुणी उडवल्या दांड्या, कुणी केली जबराट फटकेबाजी; ‘हे’ आहेत यंदा आयपीएलमध्ये पैसावसूल प्रदर्शन करणारे खेळाडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---