Rishabh Pant Bowling: भारतीय क्रिकेट सघाला 19 सप्टेंबरपासून मायदेशात बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. तत्पूर्वी भारतीय खेळाडू देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा खेळण्यात व्यस्त आहेत. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत हादेखील दिल्ली प्रीमियर लीगमध्ये खेळत आहे. या स्पर्धेत पंतचा नवा अवतार क्रिकेटचाहत्यांना पाहायला मिळाला.
दिल्ली प्रीमियर लीगच्या उद्घाटनाच्या सामन्यात पंत गोलंदाजी करताना दिसला. पंत टीम पुरानी दिल्ली संघाचे नेतृत्व करत आहे. टीम साऊथ दिल्ली सुपरस्टार्स विरुद्धच्या सामन्यातील शेवटचे षटक त्याने टाकले. साऊथ दिल्ली सुपरस्टार्स संघाला शेवटच्या षटकात विजयासाठी केवळ एका धावेची गरज असताना पंतने स्वत: ग्लोव्ह्ज फेकून गोलंदाजीची धुरा आपल्या होती घेतली. मात्र, त्याचा पहिलाच चेंडू फुलटॉस गेला आणि विरोधी फलंदाजाने एक धाव घेत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. मात्र पंतला नव्या अवतारात पाहून खुद्द समालोचकांनाही आश्चर्य वाटले.
पंतची ॲक्शन हुबेहुब शेन वॉर्नसारखी होती
पंतने टाकलेल्या चेंडूने अनेकांना महान लेगस्पिनर शेन वॉर्नची आठवण करून दिली. पंतची गोलंदाजी शैली हुबेहुब शेन वॉर्नसारखी होती. पंत ज्या पद्धतीने लेगस्पिन गोलंदाजी करतो ते सोपे काम नाही. या प्रकारचा चेंडू टाकण्यासाठी बोटांऐवजी मनगटाचा वापर करून गोलंदाजी करावी लागते.
@twitfrenzy_ pic.twitter.com/tHXHlexN6y
— KL QUEEDA (@indianspirit070) August 17, 2024
दरम्यान दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर शनिवारी (17 ऑगस्ट) दिल्ली प्रीमियर लीगला सुरुवात झाली. आयपीएलच्या धर्तीवर डीडीसीएने प्रथमच डीपीएल सुरू केले आहे. या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पंतच्या नेतृत्वाखालील पुरानी दिल्ली संघाचा सामना आयुष बडोनीच्या नेतृत्वाखालील साऊथ दिल्ली सुपरस्टार्स संघाशी झाला होता. या सामन्यात पुरानी दिल्ली संघाने प्रथम फलंदाजी करत 197 धावा केल्या. प्रत्युत्तरात साऊथ दिल्ली सुपरस्टार्स संघाने 5 चेंडू शिल्लक असतानाच लक्ष्य गाठले. पंतने फलंदाजी करताना 32 चेंडूत 35 धावांची खेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या-
धोनी, कोहली की रोहित सर्वोत्तम कर्णधार कोण? बुमराहनं केला मोठा खुलासा
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी पॅट कमिन्सने घेतला मोठा ब्रेक, कारण जाणून व्हाल हैराण
पाकिस्तान सरकारनं हाॅकी दिग्गजांचा केला अपमान?