---Advertisement---

DC vs KKR: दिल्ली-कोलकाता आमने-सामने, कोण मारणार बाजी?

On: मंगळवार, एप्रिल 29, 2025 5:52 PM
---Advertisement---

आयपीएल 2025 स्पर्धेत आज अक्षर पटेलची दिल्ली कॅपिटल्स आणि अजिंक्य रहाणेची कोलकाता नाईट रायडर्स दोन्ही आमने-सामने असणार आहेत. हा सामना दिल्लीच्या घरेलू मैदानावर म्हणजेच अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दिल्ली पॉईंट्स टेबलवर सध्या चौथ्या क्रमांकावर आहे, तसेच कोलकाता सातव्या स्थानावर आहे.

दिल्लीने आतापर्यंत नऊ सामने खेळले आहेत. यादरम्यान 6 सामन्यांमध्ये त्यांनी विजय मिळवला आहे. तसेच तीन सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. दिल्लीला त्यांच्या मागच्या सामन्यात आरसीबीकडून पराभव पत्करावा लागला होता, तसेच कोलकाताला सलग पराभव स्वीकारावा लागला आहे. केकेआरने 9 सामन्यांमधील फक्त 3 सामने जिंकले आहेत. तसेच एका सामन्यात त्यांना पावसामुळे सामना खेळता आला नव्हता.

केकेआर आणि दिल्ली कॅपिटल्सच्या हे टू हेड सामन्यांमध्ये कोलकाता संघाचं पारडं जड आहे. केकेआरने आयपीएलमध्ये आतापर्यंत दिल्लीला 18 वेळा मात दिली आहे, तसेच दिल्लीने कोलकाताला आतापर्यंत 15 वेळा हरवले आहे. अरुण जेटली स्टेडियमवर दोन्ही संघ बरोबरी वरच आहेत.

दिल्लीवरील अरुण जेटली स्टेडियमचे मैदान छोटे आहे, खेळपट्टी सुद्धा स्लो आहे. धावांचा पाठलाग करणे या मैदानावर सोपे मानले जाते. आरसीबीने धावांचा पाठलाग करून दिल्लीचा पराभव याच मैदानावर केला होता.

दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हन:

दिल्ली कॅपिटल्स: फाफ डु प्लेसिस, अभिषेक पोरेल, करुण नायर, केएल राहुल (यष्टीरक्षक), अक्षर पटेल (कर्णधार), ट्रस्टन स्टब्स, विपरज निगम, मिशेल स्टार्क, दुष्मंथा चमीरा, कुलदीप यादव आणि मुकेश कुमार.

कोलकाता नाइट राइडर्स – रहमानुल्लाह गुरबाज़ (यष्टीरक्षक), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), वेंकटेश अय्यर, अंगकृष रघुवंशी, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, मोइन अली, वैभव अरोड़ा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---