‘मिनी वर्ल्डकप’ म्हणून ओळखली जाणारी युरोपातील सर्वात मोठी स्पर्धा युरो कपला ११ जूनपासून सुरुवात झाली आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी (१२ जून) डेन्मार्क विरुद्ध फिनलँड अशा सुरू असलेल्या सामन्यात एक दुर्दैवी घटना घडली. डेन्मार्कचा मिडफिल्डर ख्रिस्टीयन एरिक्सन हा चालू सामन्यात अचानकपणे मैदानात कोसळला. पुढील उपचारासाठी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
एरिक्सन याला हृदयविकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, या घटनेनंतर मैदानात हजर असलेले प्रेक्षक व त्याचे संघ सहकारी दुःखात गेले आहेत. एरिक्सन याने युरो कप क्वलिफायर्समध्ये डेन्मार्कसाठी पाच गोल केले होते. तसेच सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजत आहे.
Following the medical emergency involving Denmark’s player Christian Eriksen, a crisis meeting has taken place with both teams and match officials and further information will be communicated at 19:45 CET.
The player has been transferred to the hospital and has been stabilised.
— UEFA (@UEFA) June 12, 2021
A footage showing the exact moment Christian Erickson collapsed on the pitch #EUROS2020 #Euro2021 pic.twitter.com/l3flVpnlcS
— Boy Child. (@boychild01) June 12, 2021
डेन्मार्क आणि फिनलँड सामन्यात घडली घटना
युरो कप २०२१ मधील तिसरा सामना डेन्मार्क विरुद्ध फिनलँड असा डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन येथे सुरू होता. अटीतटीचा चाललेला हा सामना गोलशून्य बरोबरीत असताना डेन्मार्कचा मिडफिल्डर ख्रिस्टीयन एरिक्सन अचानकपणे मैदानात कोसळला. तो पडलेला पाहून डेन्मार्क संघाचे मेडिकल टीम तात्काळ मैदानात हजर झाली. त्याला पुढील उपचारासाठी त्वरेने दवाखान्यात दाखल केले गेले. या घटनेनंतर आयोजकांनी हा सामना स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
महत्त्वाच्या बातम्या –
रिषभचा धडाका कायम! पंतचे सराव सामन्यात शानदार शतक; गिल-इशांतची लक्षवेधी कामगिरी
काय सांगता? शून्यावर बाद होऊनही ‘या’ खेळाडूला प्रेक्षकांनी दिली होती मानवंदना
फ्रेंच ओपन २०२१: बार्बरा क्रेचीकोवाने लाल मातीवर रचला इतिहास, पटकावले पहिलेच ग्रँडस्लॅम विजेतेपद