पुणे – डेक्कन एज्युकेशन सोसायटी व शेपींग चॅम्पियन्स फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डीईएस एमएसएलटीए पीएमडीटीए अखिल भारतीय मानांकन(१६ वर्षाखालील) चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात प्रज्ञेश शेळके, रोहन बजाज, सक्षम भन्साळी, दक्ष पाटील, नीव कोठारी यांनी तर, मुलींच्या गटात काव्या देशमुख, देवांशी प्रभुदेसाई, स्वरा जावळे यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आगेकूच केली.
फर्ग्युसन कॉलेज टेनिस अकादमी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत मुलांच्या गटात अव्वल मानांकित आराध्य म्हसदेने आदित्य योगीचा ६-२, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. काल मानांकित खेळाडूवर विजय मिळवणाऱ्या प्रज्ञेश शेळकेने नीव गोगियाचा ६-३, ६-४ असा पराभव केला. आठव्या मानांकित जय गायकवाडने आदित्य गायकवाडचा टायब्रेकमध्ये ६-०, ७-६(२) असा पराभव केला. सातव्या मानांकित दक्ष पाटीलने क्वालिफायर आर्यन किर्तनेचा ७-५, ६-१ असा तर, दुसऱ्या मानांकित सक्षम भन्साळीने शारव शर्माचा ६-०, ६-२ असा सहज पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली.
मुलींच्या गटात अव्वल मानांकित स्वानिका रॉयने वैष्णवी नागोजीचे आव्हान ६-०, ६-२ असे संपुष्टात आणले. शर्मिष्ठा कोद्रेने रितू ग्यानचा टायब्रेकमध्ये ७-५, ७-६(५) असा पराभव केला. चौथ्या मानांकित मेहक कपूरने आरोही देशमुखला ६-२, ६-२ असे नमविले. दुसऱ्या मानांकित काव्या देशमुखने अहाना पाटीलचा ६-३, ६-० असा पराभव करून आगेकूच केली. तिसऱ्या मानांकित देवांशी प्रभुदेसाईने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या रित्सा कोंडकरचा ६-०, ६-१ असा पराभव केला. वैष्णवी चौहानने परी हिंगलेचा ६-४, ६-४ असा संघर्षपूर्ण पराभव केला.
निकाल: मुख्य ड्रॉ: दुसरी फेरी:
मुले:
आराध्य म्हसदे(१)वि.वि.आदित्य योगी ६-२, ६-३;
प्रज्ञेश शेळके वि.वि.नीव गोगिया ६-३, ६-४;
रोहन बजाज(४)वि.वि.अमोघ पाटील ६-२, ६-१;
जय गायकवाड(८)वि.वि.आदित्य गायकवाड ६-०, ७-६(२);
अंश रामाणी वि.वि.अंशुल पुजारी ७-५, ६-२;
नीव कोठारी(३) वि.वि.स्वर्णिम येवलेकर ६-१, ६-१;
दक्ष पाटील(७)वि.वि.आर्यन किर्तने ७-५, ६-१;
सक्षम भन्साळी(२)वि.वि.शारव शर्मा ६-०, ६-२;
मुली:
स्वानिका रॉय(१)वि.वि.वैष्णवी नागोजी ६-०, ६-२;
शर्मिष्ठा कोद्रे वि.वि.रितू ग्यान ७-५, ७-६(५);
मेहक कपूर(४)वि.वि.आरोही देशमुख ६-२, ६-२;
स्वरा जावळे(८)वि.वि.जान्हवी चौगुले ७-५, ६-१;
श्रीमोइ कामत(५)वि.वि.सृष्टी मिरगे ६-२, ६-२;
देवांशी प्रभुदेसाई(३)वि.वि.रित्सा कोंडकर ६-०, ६-१;
वैष्णवी चौहान वि.वि. परी हिंगले ६-४, ६-४;
काव्या देशमुख(२)वि.वि.अहाना पाटील ६-३, ६-०.