---Advertisement---

स्टेडियममध्ये असूनही सचिनने अर्जुनला पदार्पण करताना पाहिले नाही, मास्टर ब्लास्टरने स्वतः केला खुलासा

On: सोमवार, एप्रिल 17, 2023 4:06 PM
Sachin Tendulkar Arjun Tendulkar
---Advertisement---

भारतीय संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने रविवारी (16 एप्रिल) आपला पहिला आयपीएल सामना खेळला. सचिनने आपल्या संपूर्ण आयपीएल कारकिर्दीत मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व केले आणि अर्जुनला देखील याच फ्रँचायझीकडून आयपीएल पदार्पणाची संधी मिळाली. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धचा हा सामना पाहण्यासाठी सचिन स्वतः स्टेडियमवर उपस्थित होता. पण त्याने अर्जुलना खेळताना पाहिले नाही. सामना संपल्यानंतर सचिनने यामागचे कारण देखील स्पष्ट केले.

अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याने आपल्या पहिल्या सामन्यात 2 षटके गोलंदाजी केली. यात त्याने 17 धावा खर्च केल्या आणि एकही विकेट घेऊ शकला नाही. अर्जुनप्रामाणे सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) साठीदेखील हा क्षण महत्वाचा होता. पण तरीदेखील सचिनने अर्जुनला प्रत्यक्षात पदार्पण करताना पाहिले नाही. सामना सुरू होण्याआधी देखील सचिन अर्जुनशी चर्चा करताना दिसला होता. अर्जुनला गोलंदाजी करताना का पाहिले नाही, याचे ठोक कराण देखील सचिनकडे आहे.

सामना संपल्यानंतर सचिन म्हणाला, “माझ्यासाठी हा एक नवीन अनुभव होता, कारण मी आतापर्यंत कधीच त्याचा सामना पाहण्यासाठी गेलो नव्हतो. त्याने मोकळेपणाणे खेळावे अशी माझी इच्छा होती, जे त्यालाही करायचे होते. आजच्या सामन्यातही मी ड्रेसिंग रूममध्ये बसलो होतो. अर्जुन त्याच्या रणनीतीवरून भटकू नकेय असे मला वाटत होते. मी हा सामना पाहत आहे, हे स्टेडियममधील मोठ्या स्क्रीनपर पाहून त्याला आश्चर्य वाटू शकत होते. त्यामुळे मी ड्रेसिंग रूममध्ये गेलो होतो. ही एक वेगळीच भावना असते. मी 2008 साली पदार्पण केले होते आणि 16 वर्षांनंतर त्यानेही आयपीएल पदार्पण केले आहे. दोघांचा संघही एकच आहे.”

दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर मुंबईला विजयासाठी 186 धावांचे लक्ष्य मिळाले होते. केकेआरने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. वेंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) याने 51 चेंडूत 104 धावा कुटल्या. केकेआरने 6 विकेट्सच्या नुकसानावर 185 धावा केल्या. पण प्रत्युत्तरात मुंबईसाठी ईशान किशन (Ishan Kishan) याने 58, तर सूर्यकुमार यादव याने 43 धावांची ताबडतोड खेळी केली. मुंबईने 5 विकेट्स आणि 14 चेंडू शिल्लक असताना विजय मिळवला. (Despite being at the stadium, Sachin did not see Arjun making his IPL debut, the master blaster himself revealed)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

आरसीबीविरुद्धच्या सामन्यापूर्वी धोनीच्या दुखापतीविषयी धक्कादायक ब्रेकिंग! बॅटिंग कोच स्पष्टच म्हणाला…
राशिद खानविरुद्ध तळपली सॅमसनची बॅट, षटकारांची हॅट्रिक केल्यानंतर बनला मोठा विक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---