---Advertisement---

सामना गमावूनही सूर्यकुमारने मन जिंकले! सचिन तेंडुलकरच्या खास क्लबमध्ये एन्ट्री

On: शनिवार, मे 27, 2023 2:49 PM
Suyakumar Yadav
---Advertisement---

मुंबई इंडियन्सला मध्यक्रमातील फलंदाज सूर्यकुमार यादव याच्याकडून चाहत्यांना नेहमीच आक्रमक खेळीची अपेक्षा असते. शुक्रवारी (26 मे) सूर्यकुमार क्वॉलिफायर दोनमध्ये गुजरात टायटन्सला पराभूत करेल, अशी चाहत्यांना अपेक्षा होती. पण चाहत्यांची ही इच्छा सूर्यकुमार पूर्ण करू शकला नाही. असे असले तरी, त्याने या सामन्यात केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर सचिन तेंडुलकरच्या खास क्लबमध्ये जागा मिळवली आहे.

इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स सर्वाधिक पाच वेळा विजेता ठरला आहे. संघातील फलंदाज नेहमीच मुंबईच्या यशाचे कारण ठरले आहे. सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, कायरन पोलार्ड या आणि अशी अनेक फलंदाजांनी मुंबईचे प्रतिनिधित्व केले आहे. पण या सगळ्यांमध्ये सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) सर्वोत्तम राहिला आहे. एका आयपीएल हंगामात मुंबईसाठी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आजही सचिन तेंडुलरच्या नावावर आहे. यावर्षी सूर्यकुमार यादव सचिनचा हा विक्रम मोडू शकत होता. पण अवघ्या 13 धावा करमी पडल्यामुळे सचिनचा विक्रम अबाधित राहिला आहे.

सचिन तेंडुलकरने आयपीएल 2010मध्ये मुंबई इंडियन्ससाठी 618 धावा केल्या होत्या. हा विक्रम आजही मुंबईचा कोणताच फलंदाज मोडू शकला नाहीत. शुक्रवारी सूर्यकुनार यादवने 38 चेंडूत 61 धावांची खेळी केली. या प्रदर्शनानंतर हंगामात त्याच्या एकूण 605 धावा पूर्ण झाल्या. मुंबईसाठी एका आयपीएल हंगामात 600 पेक्षा जास्त धावा करणारे केवळ दोन फलंदाज आहे. एक म्हणजे सचिन तेंडुलकर आणि दुसरा फलंदाज शुक्रवारी सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) ठरला. मुंबईसाठी एका हंगामात सर्वोत्तम फलंदाजी करणाऱ्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पुन्हा एकदा सचिनचेच नाव येते. चौथ्या क्रमांकावर लेंडल सिमन्स आहे आणि पाचवा क्रमांक रोहित शर्माचा आहे.

मुंबईकडून एका हंगामात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
618 – सचिन तेंडूलकर, 2010
605 – सुर्यकुमार यादव, 2023
553 – सचिन तेंडूलकर, 2011
540 – लेंडल सिमन्स, 2015
538 – रोहित शर्मा, 2013

दरम्यान, मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील क्वॉलिफायर दोनचा एकंदरीत विचार केला, तर मुंबईला विजयासाठी 234 धावांचे लक्ष्य मिळाले होते. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 3 बाद 233 धावा केल्या होत्या. शुबमन गिल याने अवघ्या 60 चेंडूत 129 धावा कुटल्या. पण प्रत्युत्तरात मुंबईळा आपली 20 षटके खेळूनही काढता आली नाहीत. 18.2 षटकांमध्ये 171 धावा करून मुंबईचे सर्व फलंदाज बाद झाले. (Despite losing the match, Suryakumar won hearts! Entry into Sachin Tendulak’s club)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टिम डेविडची एक चूक अन् मुंबईचं फयनलचं तिकिट कॅन्सल! मोजावी लागली 99 धावांची किंमत
‘सूर्याने सहा सिक्स मारले असते तरी फरक पडला नसता…’, जाणून घ्या मोहित शर्मा असं का म्हणाला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---