मागच्या काही दिवसांमध्ये भारतीय क्रिकेटमध्ये काही मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. भारतीय क्रिकेटमधील अनेक महत्वाच्या पदांवर काही नवीन नावांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (एनसीएस) प्रमुखपदासाठीही नवीन नियुक्ती करण्यात आली आहे. राहुल द्रविड यांची भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर दिग्गज व्हीव्हीएस लक्ष्मण यांना एनसीएस प्रमुख बनवले गेले आहे. अशात बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या मते लक्ष्मण यांनी हे पद स्वीकारल्यानंतर त्यांना आर्थिक नुकसान होणार आहे.
भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी राहुल द्रविड आणि एनसीएस प्रमुखपदी लक्ष्मण यांची नियुक्ती झाल्यानंतर भारतीय क्रिकेट सुरक्षित हातांमध्ये असल्याचे सौरव गांगुली यांनी सांगितले आहे. मी त्यांच्या मुख्य प्रशिक्षक आणि एनसीएस प्रमुखपदी झालेल्या नियुक्तीमुळे खुश आहे, कारण भारतीय क्रिकेटमध्ये ही दोन पदे महत्वपूर्ण आहेत, असेही गांगुलींनी सांगितले आहे. गांगुली, द्रविड आणि लक्ष्मण हे तिघे यापूर्वी १९९६ ते २००८ या दरम्यान भारताच्या मध्यला फळीत एकत्र खेळले आहेत.
गांगुलींच्या मते एनसीए प्रमुखाच्या रूपात लक्ष्मण यांच्याकडून भारतीय क्रिकेटला खूप फायदा होणार आहे. बीसीसीआयच्या नियमांनुसार लक्ष्मण यांनी या पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी इतर कोणत्याही संथ्येत काम करता येणार नाही. यापूर्वी लक्ष्मण आयपीएल फ्रेंचायझी सरनरायझर्स हैदराबादसाठी मेंटॉरची भूमिका पार पाडत होते. एनसीएस प्रमुखाचे पद स्वीकारण्यासाठी त्यांनी सनरायझर्स हैदराबाद संघाचे मेंटॉरपद सोडावे लागले होते. त्यांनी काही दिवसांपूर्वी आयपीएल फ्रेंचायझीसोबतचा संबंध तोडला आहे.
तसेच त्यांना यापुढे कोणत्याही कार्यक्रमात समोलोचन करता येणार नाही आणि कोणत्याच वृत्तपत्रासाठी ते यापुढे कॉलमही लिहू शकणार नाहीत. परिणामी या सगळ्या गोष्टींचा त्यांच्या आर्थिक उत्पन्नावर परिणाम पडणार आहे.
लक्ष्मण यांनी भारतीय क्रिकेटची सेवा करण्यासाठी हा मोठा निर्णय घेतल्याचे गांगुलींनी सांगितले आहे. ते म्हणाले की, ‘ते फक्त भारतीय क्रिकेटची सेवा करण्यासाठी हैदराबादमधून पुढच्या तीन वर्षांसाठी बंगळुरुला जात आहेत. हे प्रत्यक्षात कौतुकास्पद काम आहे. निश्चितच यामुळे त्यांच्या कमाईत कमतरता येईल, पण होय, ते तयार झाले आहेत. त्यांची पत्नी आणि मुलही बंगळुरुला स्थाईक होतील. त्यांची मुले आता बंगळुरुच्या शाळेत शिकतील. कुटुंबाच्या रूपात हे एक अवघड काम आहे, जे ते फक्त भारतीय क्रिकेटच्या भल्यासाठी करत आहेत.’
महत्त्वाच्या बातम्या –
वुमेन्स बिग बॅश लीगमध्ये स्म्रीती मंधनाचा शतकी धमाका! ‘असा’ पराक्रम करणारी पहिलीच भारतीय
येत्या जानेवारी महिन्यात रंगणार १९ वर्षाखालील विश्वचषकाचा थरार; जाणून घ्या स्पर्धेबदल सर्व काही
भारताची एक नंबर जोडी! रोहित-राहुलने ५० धावांच्या भागीदारीसह ‘या’ विक्रमात मिळवला पहिला क्रमांक