आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात सर्व संघांचे एक-एक सामने झाले आहेत. यामध्ये काही संघांनी त्यांच्या अपेक्षेप्रमाणे अप्रतिम प्रदर्शन केले तर काहींच्या हाती निराशा आली. दुसऱ्या टप्प्यातील अजून बरेच सामने राहिले असून गुरुवारी (२३ सप्टेंबर) रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स आणि इयोन माॅर्गनच्या नेतृत्वातील कोलकाता नाईट रायडर्स या दोन संघांमध्ये सामना रंगणार आहे.
मुंबई इंडियन्सची युएईमधील दुसऱ्या टप्प्याची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही, तर कोलकाता नाईट रायडर्सने त्यांच्या पहिल्या सामन्यात चांगले प्रदर्शन करत विजय मिळवला आहे. गुणतालिकेत यावेळी दोन्ही संघ ८-८ गुणांसह (मुंबई) चौथ्या आणि (कोलकाता) पाचव्या स्थानावर आहे. गुरुवारी या दोन्ही संघात होणाऱ्या सामन्यामध्ये प्रेक्षकांना टोकाचा संघर्ष पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे. तत्पूर्वी जाणून घेऊया हा सामना कुठे, कधी होईल आणि तो तुम्ही आम्ही कसा पाहू शकतो?
कधी खेळला जाणार आहे मुंबई आणि कोलकाता यांच्यातील सामना?
आयपीएल २०२१ चा ३४ वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात २३ सप्टेंबरला खेळला जाणार आहे.
किती वाजता होणार आहे सामना?
भारतीय वेळेनुसार रात्री ७.०० वाजता सामन्याची नाणेफेक होईल आणि ७.३० वाजता सामन्याला सुरुवात होईल.
कुठे होणार आहे सामना?
हा सामना यूएईतील अबू धाबीमध्ये शेख जायेद स्टेडियममध्ये खेळला जाईल.
लाईव्ह सामना टिव्हीवर कुठे पाहिला जाऊ शकतो?
मुंबई आणि कोलकातामध्ये होणार हा सामना आपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनल्सवर ८ वेगवेगळ्या भाषांमध्ये पाहू शकतो. हिंदी आणि इंग्रजीव्यतिरिक्त हा सामना इतर प्रादेशिक भाषांमध्येही पाहिला जाऊ शकतो.
सामना ऑनलाईन पाहण्यासाठी कशाची आवश्यकता?
या दोन संघांतील सामना आपण ऑनलाईन स्ट्रीमिंग सब्सक्रिप्शनसह डिज्नी प्लस हाॅटस्टारवर पाहू शकतो.
मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, सौरभ तिवारी, कायरन पोलार्ड, कृणाल पंड्या, ऍडम मिल्ने, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, राहुल चाहर
कोलकाता नाईट रायडर्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), आंद्रे रसेल, शुभमन गिल, वेंकटेश अय्यर, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, इयॉन मॉर्गन (कर्णधार), सुनील नारायण, वरुण चक्रवर्ती, प्रसिध कृष्णा, लॉकी फर्ग्युसन
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबईकरांना पुनरागमन करणं चांगलचं माहित आहे! संघनायक रोहतची केकेआरला चेतावणी, वाचा काय म्हणाला?
‘त्या’ व्यक्तीने विराटला टी२० अन् वनडेची कॅप्टन्सी सोडण्याचा दिला होता सल्ला, रहस्य उलगडलं!






