---Advertisement---

ऑलिंपिक पुढे ढकलण्यात आल्यामुळे युवा खेळाडूंना होणार फायदा : दिलप्रीत सिंग

On: मंगळवार, ऑक्टोबर 20, 2020 5:11 PM
---Advertisement---

कोरोना व्हायरसमुळे यावर्षी होणारी ऑलिंपिक स्पर्धा २०२१ पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय हॉकी संघातील युवा खेळाडूंसाठी हा काळ खूप महत्त्वपूर्ण असल्याचे भारतीय हॉकीपटू दिलप्रीत सिंगने म्हटले आहे.

तो म्हणाला की, “ऑलिंपिक स्पर्धा २०२१ मध्ये होणार आहे. त्यामुळे युवा हॉकीपटूंना त्यांच्या कौशल्यात अजून सुधार करण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. सध्याचा एक-एक दिवस त्यांच्यासाठी खूप मोलाचा आहे. ऑलिंपिकमध्ये खेळणे हे प्रत्येक क्रिडापटूचे स्वप्न असते. आम्हाला ती संधी मिळाली आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात ऑलिंपिकमध्ये आमचे उत्कृष्ट देत स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी सर्वजण तयारीला लागले आहेत.”

“तसेच कोरोना व्हायरसमुळे काही महिन्यांसाठी पूर्ण क्रिडा क्षेत्र ठप्प पडले होते. पण परिस्थितीत सुधार झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यापासून हॉकीपटूंनी सरावास सुरुवात केली आहे. त्यामुळे मोठ्या सुट्टीनंतर पुन्हा मैदानावर सराव करताना माझा उत्साह दुप्पटीने वाढला आहे. जस-जसे दिवस जात आहेत, तस-तशी माझ्या खेळात अजून जास्त सुधारणा आहे,” असे पुढे बोलताना दिलप्रीत म्हणाला.

२० वर्षीय दिलप्रीत याने २०१८ सालच्या हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी ब्रेडा स्पर्धेत संघाला रौप्य पदक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. तसेच त्याचवर्षी आशियाई स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने कांस्य पदकही जिंकले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

आनंदाची बातमी! हरियाणातील छोट्या गावात बनणार आंतरराष्ट्रीय स्तरावरील मैदान, ‘हा’ खेळाडू झाला खूश

नुकताच कोरोनातून बरा झालेला खेळाडू म्हणतोय, “आता लागतो ‘या’ गोष्टीच्या तयारीला”

ऑलिंपिक तयारीसाठी हॉकी इंडियाने कसली कंबर, क्रिडाविषयक…

‘…तर ऑलिंपिकसारख्या मोठ्या स्पर्धेत भारतीय संघाला खूप मदत मिळेल’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---